Authors : रामेश्वरी ग. रंगारी
Page Nos : 222-227
Description :
सध्या भारतात समाज माध्यमांमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे देशभरातील शहरी तसेच ग्रामीण भागांमधील समाजात भोगवादाला स्थान दिल्याचे दिसुन येते भोगवाद घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे या बदला मागे समाज प्रसारमाध्यमं, प्रभाव बदलती सामाजिक मुल्ये, महिलांचे वाढते आर्थिक स्वातंत्र्य आणि पारंपारिक लिंग भूमिका मधील बदल ही प्रमुख कारणे आहेतच शिवाय प्रसार माध्यामांमुळे वृत्तपत्रे , रेडिओ सिनेमा इत्यादी जी लोकमाध्यमे आहेत त्याचाही परिणाम व्यक्तीच्या सामाजिक भावनिक जडणघडणीवर विकासावर होत असतो हे लक्षात घ्यावयास हवे सिनेमातून अश्लीलता किंवा मारपीटीचे तसेच भोगवादी विलासी जीवनाचे दृष्य सातत्याने मुलांच्या पाहण्यात आली तर कळत नकळत मुलांच्या सामाजिक विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे सिनेमा दूरदर्शन इत्यादी लोकं माध्यमांनी आणि शक्यतेवर अपराधी वृत्ती लुटालूट , मारपीठ , विलासीपद्धतीचे जीवन इत्यादी प्रकारची कथा नक्की दाखवू नयेत वृत्तपत्रांमध्ये देखील शोध पत्रकारितेचे अवडंबर माजविण्यात आलेली आहे त्याचेही परिणाम व्यक्तीच्या सामाजिक विकासावर चांगले होऊ शकत नाही . वाढत जाणाऱ्या घटस्फोटाच्या समस्येच्या दुष्परिणामावर लगेच उपाय योजना करून सामाजिकदृष्ट्या समतोल राखणे आवश्यक बाब झाली आहे.