Special Issue Description


Authors : अनिल बोपचे

Page Nos : 217-221

Description :
मराठी साहित्य विश्वात दलित साहित्याचा समृद्धरित्या उगम झाला. मराठी साहित्याच्या सर्व साहित्य प्रकारातून दलित साहित्यिक प्रकर्षाने लेखन करू लागले. त्यांच्या साहित्य लेखनामुळे मराठी साहित्याचे विश्व समृद्ध झाले. कविता, कथा,आत्मकथन या साहित्य प्रकारात दलित साहित्याने उत्तुंग भरारी मारली. तशी भरारी कादंबरी प्रकारात मारता आली नाही. दलित कादंबरी आपल्या पूर्वार्धात प्रकर्षाने साकार झाली. मात्र उत्तरार्धात ती काही क्षिण झाल्याचे दिसून येते. तरीही दलित कादंबरीचे महत्त्व नाकारता येत नाही. दलित कादंबरीतून सामाजिक चित्रणावर भर दिल्या जाते. तसेच या कादंबरीतून वास्तववादी चित्रण करण्यात येते. त्यामुळे दलित कादंबरी म्हणजे समकालीन वास्तवाला समर्थपणे उजागर करणारी कादंबरी होय असे म्हटले जाते. दलित कादंबरीचा मूळ गाभा म्हणजे दलित जीवनाची प्रकर्षाने मांडणी करणे हेच होय. दलित कादंबरी पूर्वार्धात ज्या पद्धतीने साकार झाली त्याच स्वरूपात उत्तरार्धात सुद्धा साकार झाली.

Date of Online: 30 Oct 2025