Authors : O. M. Gajbhiye
Page Nos : 333-337
Description :
मानवजातीच्या संपूर्ण इतिहासात अनेक वेळा साथींच्या रोगांचा प्रादर्भाव झालेला दिसून येतो. साथीच्या रोगांच्या उद्भव अनेकदा
विषाणूंपासून होतो. हे विषाणू मानवाला प्रचंड घातक ठरलेले दिसून येतात. विषाणूंपासून उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांनी प्राचीन काळापासून
मानवी इतिहासावर मोठे परिणाम कलेले आढळतात. इ.स.पूर्व काळापासूनच्या साथीच्या रोगांच्या व त्याच्या दुष्परिणामाच्या नोंदी जगातील
अनेंक राष्ट्रात आढळून येतात. सिरका,प्लेग, अँटोनियन प्लेग, सायप्रीयन प्लेग, फ्लु,पोलीयो,स्पॅनीष फ्लू,एषियन फ्लू,एडस स्वाइन फ्लू,
इबोला,सार्स,मर्स झीका व कोरोना यासारख्या साथीच्या रोगांनी मानवाच्या सर्वांगीन जीवनावर व व्यवस्थावर अत्यंत दूरगामी परिणाम
केलेले आहेत. या रोगामुळे सामाजिक,राजकीय,आर्थिक,परिणामाबरोबरच मानवी मनोदषेवरही विपरित परिणाम झाले. अनेक राष्ट्रांच्या
अर्थव्यवस्था उध्वस्त झाल्या. मोठमोठी राजघरानी सुध्दा उध्वस्त झाली. राजकिय व सामाजिक उलथापालथी झाल्या.
कोटयावधी लोकांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या या साथीच्या रोगांचा उद्भव मानवी संस्कृतीने सातत्याने सहन केलेला आहे . अत्यंत
बुध्दीमान व शक्तीषाली समजल्या जाणाऱ्या मानवाला अनेकदा न दिसणाऱ्या विषाणूने हतबल करून टाकले अनेकदा दैवी कोप म्हणून या
संकटाकडे पाहिले गेले. गावे आणि शहरे ,गरीब आणि श्रीमंत असा भेद न करणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव पषु-पक्षांपासून होतो असा
आतापर्यंत समज होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मात्र साथीच्या रोगाचे विषाणु प्रयोगषाळेत विकसित केले जाऊ शकतात
असेही दिसून आले आहे. हे मानवनिर्मिती विषाणू पुढील काळात अधिक विनाषकारी ठरून त्यापासून संपुर्ण मानव जातीला व
सजीवसृष्टीलाही मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावलेली आहे . मानवी प्रगतीबरोबरच मानवानेच निर्मिलेला विषाणू मानवाचेच
अस्तित्व नष्ट करेल की काय अषी चिंता आता भेडसावू लागलेली आहे. त्यामुळे अषा प्रकारच्या साथीच्या रोगांबाबत मानवाने अधिक सतर्क
राहण्याची आता गरज आहे.