Special Issue Description


Authors : B. K. Lawhale

Page Nos : 243-250

Description :
संप्रति कोरोनाच्या प्रभावात असलेली संपूर्ण मानव जाती विशाल संकटाशी सामना करतांना दिसत आहे . कोरोना हे संकट केवळ आपल्या भारतापूरते मर्यादित नसून संपूर्ण जगात त्याचा विळखा बसलेला दिसतो. जगापुढे अनेक प्रकारच्या संकटांनी युक्त असलेला कोरोना अवाढव्य रूपाने ठाम मांडून उभा आहे . कोरोना महामारीच्या आक्रमणात अखिल मानवी समाज सापडलेला असून यातून सुटका होण्यासाठी तो सर्वतोपरीने प्रयत्न करतांना दिसत आहे . कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी दोन-दोन हात करून लढत असणारे कोरोनाबाधित रूग्ण, डॉक्टर्स , नर्स , पोलीस यंत्रणा तसेच समाजसेवक नानाप्रकारे प्रयतन् करीत असलेले दिसून येतातण. या कोरोनाने सुरळीत चालत असलेले मानवी जीवन विस्कळीत करून टाकले आहे . अशा वेळी वेगवेगळ्या स्तरांवरून होत असलेल्या उपाययोजना नक्कीच लक्षणीय आहते. कोरोनापासून रक्षण व्हावे यासाठी प्रसारमाध्यमांव्दारा देखील जनजागृती करणे चालू असल्याचे आढळते. वेगवेगळ्या स्तरांवर नानाप्रकारच्या उपाय-योजना चालूअसतांना वैयत्तीक स्तरांवरही काही उपाय योजना करणे अत्यंत महत्वाचे ठरते. या उपाययोजनांच्याव्दारे मानवाला कोरोनाशीदोन-दोन हात करण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिकार - क्षमता वाढतवणे हा मुख्य घटक आहे. प्रतिकार क्षमता चांगली असल्यास कोरोनाची लागन होणे किंवा प्रसार होणे याला नक्कीच आळा बसू शकतो. वरील उल्लेखिलेल्या उपाय-योजनांप्रमाणेच प्रतिकार क्षमता वाढविण्यात मदत करणारा अतिशय महत्वाचा भाग म्हणजेच पतंजलीने वर्णन केलेल्या योगशास्त्रातील महत्वाच्या अंगांची साधना होय. कोरोनाशी लढा देण्यात आपल्याला या योगाच्या अंगांची मदत कशी होते. याचा विचार प्रस्तुत शोधनिबंधात केलेला आहे.

Date of Online: 30 July 2020