Authors : S. U. Ugemuge
Page Nos : 155-159
Description :
‘‘जाळा ते अध्यात्म भाडवली ऐंका,
चुलीमध्ये फेका कर्मयोग’’
अध्यात्म, कर्मकांड, यज्ञयाग हे ब्राम्हाणानी पोटभरण्यासाठी निर्माण केलेले एक साधन आहे. आणि त्या साधनांची वारंवार भिंती
दाखवून दिन दलितांना कितेक शतकापासून लूटत आहे . ही,शोषक निती थांबली पाहीजे. त्यासाठी दिनदलित वर्ग जागृत
झाला पाहिजे ,आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढले पाहीजे, असे जहाल विचार त्यानी आपल्या विचारातुन मांडले .या वर्गाना
सुधारण्यासाठी एकच मार्ग सांगितला. तो म्हणजे शिक्षण होय. शिक्षणनच मानवाचा संपूर्ण विकास घडवून आणू शकतो, असा
आत्मविश्वास डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते.त्यासाठी त्यानीदुःखात पिचत पडलेल्या दिन दलित दुबळया समाजाच्या
अंधकारमय जिवनात प्रकाशाची ज्योत पेटविण्याचे कार्य डाॅ. बाबा साहेब आंबेडकरानी केले.‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष
करा’ हा मंत्र बहुजन वर्गाला दिला.तर विद्यार्थ्यांना ‘वाचाल तर वाचाल’ हा शिक्षणा विषयी मंत्र दिला.उच्चभ्रू वर्गाच्या बरोबरीने
येण्यासाठी प्रत्येकांने शिक्षण घेतले पाहीजे आणि उच्चवर्गीयांची प्रशासनातील नोकरीतील असलेली मक्तेदारी मोडून टाकली
पाहीजे.असा मोलाचा संदेश डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या बहुजन वगार् ला दिला. त्यांनी संविधान निर्माण करतांना सर्व
समाजातील घटकांचा विचार करून देशाची घटना निर्माण केली. ही घटना समतेवर आधारीत असल्याने सर्वाना समान
अधिकार प्राप्त झाले. आजच्या बहुजन समाजाने आपले जुने खुळचट परंपरागत सामाजिक विचार बदलवून आधुनिक विचार
पद्धतीच्या अवलंब केला पाहीजे.त्यांनी कर्मकांड सोडून त्यात वेळ न घालवता आपल्या समाजाचा व आपला विकास कसा
होईल या गोष्टीकडे विचार करावा.उच्च वर्गियाच्या बरोबरीने आपण कसे येऊ याचा विचार करावा ,व त्या दृष्टिने प्रयत्न
करावा असा मोलाचा उपदेश डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी बहुजन वर्गाला दिला. प्रत्येकांनी विज्ञानवादी दुष्टीकोण ठेवायला
पाहीजे. निसर्ग नियमांच्या विरूद्ध कोणतीच गोष्ट घडत नाही.हे सिद्ध केले.तसेच त्यांनी चमत्काराला विरोध केला