Special Issue Description


Authors : किरण चिकाटे

Page Nos : 53-56

Description :
मनुष्याने शिक्षणाच्या माध्यमातून जी उत्तुंग भरारी मारली आहे . जे स्थान पटकावले आहे ते सातत्याने टिकवावयाचे असेल त्यासाठी शिक्षणाला जीवनातून वगळता येणार नाही. शिक्षणाला जीवनात केंद्रीय स्थान आहे . जगात प्राचिन काळापासून शिक्षण प्रकिया चालू आहे परंतु आज कोविड-19 या जीवघेण्या संकटाचे मोठे संकट जगावर ओढवले असल्यामुळे त्याचा जसा आर्थिक , सामाजिक, राजकीय स्तरावर परिणाम झाला. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थावर ही खुप मोठा परिणाम झाला आहे . कोविड -19 मुळे पूर्ण देशात लाॅकडाउन करण्यात आले, त्यामुळे शैक्षणिक संस्था बंद कराव्या लागल्या आज तीन महिन्यापासून शाळा बंद आहे. सर्व विद्याथी पालक यांच्यात भयाचे वातारण निर्माण झाले आहे. प्रत्येकाला वाटू लागले कि आपण शिक्षणापासून वंचित तर नाही होणार? त्याच प्रमाणे विद्याथ्रयांना सतत घरात राहून मानसिक त्रासाला सुध्दा समोर जावे लागत आहे. र्वांचा विचार करुन अध्यन -अध्यापन चालू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये , तसेच शाळा सुरु केल्यास त्यांच्या अरोग्याला धोखा संभवतो तो टाळावा यासाठी प्रचलित अध्यन -अध्यापन न देता विद्यार्थींना इ-लर्निंग अध्यन -अध्यापन सुरु करावे असा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी कुठेही असले तरी त्यांचे शिक्षण सुरु राहील. त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. विद्याथी स्मार्टफोन, लॅपटॉप , टॅबलेट यासारख्या ऊपकरणाचा ऊपयोग करुन शिक्षण घेवू शकतात. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन सरकारने 'दिशा', पिजी पाठशाला या सारखे अप सुरु केले आहे . त्याचप्रमाणे दूरदर्शन , अकाशवाणी यामार्फत ही विद्यार्थींनपर्यंत ज्ञान पोहचेल अशी व्यवस्था केली आहे . आजच्या परिस्थितीत सर्वांनाच सामोरे जायचे आहे . घाबरुन चालणार नाही. त्यामुळे कोविड-19 मधल्या काळात विद्यार्थींना इ-लर्निंग मुळे शिक्षण मिळेल ही एक नवसंजिवनी आहे असे म्हणता येते.

Date of Online: 30 July 2020