Special Issue Description


Authors : प्रा. प्रताप शिद

Page Nos : 17-21

Description :
जागतिक स्तरावर महाभयंकर covid -19 रोगामुळे जागतिक स्तरावर सर्व क्षेत्रात मंदीची परिस्थिती अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. शेती व शेतीपूरक क्षेत्रावरही दूरगामी परिणाम होत आहेत . भारतीय अर्थव्यवस्था कृषिप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे भारताला त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील . भारतात 23 मार्च पासून लोक डाऊन प्रक्रीया सुरू झालेली आहे. त्यामुळे भारतातील ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, पोल् ट्री उत्पादक शेतकरी इत्यादिंना त्याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. परंतू सकारात्मक वृत्तीने ग्रामीण भागातील शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष दिल्यास नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल. कोरोना आपत्ती ही इष्टापत्ती मानुन नियोजन केल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्याची संधी मिळेल . यासाठी गरज आहे ती फक्त मानसिकता बदलण्याची आणि खडतर परिश्रम करण्याची.

Date of Online: 30 July 2020