Issue Description


Authors : मिलिंद अण्णा मेढे

Page Nos : 378 to 384

Description :
ग्रंथालयाचे व्यवस्थापन हे सामाजिक उदिद्ष्ट डोळयांसमोर ठेवून करावे लागते, त्यासाठी ग्रंथालयाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळयावेळी, वेगवेगळया पातळीवर निर्णय प्रक्रिया आवश्यक असते. त्याचप्रमाणे ग्रंथालयातील विविध कामे अधिक चांगल्यारितीने पार पाडण्यासाठी व्यवस्थापनातील नियोजन या कार्याचा उपयोग करावा लागतो. अशा या नियोजनात ग्रंथालयाचे चहूबाजुने विश्लेषणात्मक परीक्षण करणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते आणि हे परीक्षण स्वॉट विश्लेषण पध्दतीद्वारे यशस्वीरित्या पार पाडून ग्रंथालय विकासास हातभार लावणारे धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली जाते. अशा या स्वॉट विश्लेषण पध्दतीद्वारे ग्रंथालय व्यवस्थापनात ग्रंथालयातील अंतर्भूत ताकद आणि उपलब्ध असणारी संधी (SO), अंतर्भूत ताकद व त्यास असणारे धोके (ST), ग्रंथालयांतील दुर्बलस्थानांवर मात करण्यासाठी असणारी उपलब्ध संधी (SO), तसेच ग्रंथालयाच्या दुर्बलस्थांनांमुळे ग्रंथालयाला असणारे धोके (ST), या व्यूहात्मक नियोजनाचा परामर्श मांडव्याचा प्रयत्न प्रस्तूत लेखात करण्यात आला आहे.

Date of Online: 30 Sep 2014