Issue Description


Authors : प्रा. के. आर. रामटेके

Page Nos : 416-421

Description :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणविषयक विचार व्यापक स्वरूपाचे होते. शिक्षणाचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळायला पाहिजे असे मत त्यांचे होते. शिक्षण हा अत्यंत महत्वाचा घटक असून यातूनच मानवाचा सार्वांगीण विकास होतो. अस्पृश्य समाजामध्ये जागृती व प्रगती घडवून आणण्याचा एकमेव मार्ग शिक्षणचं आहे. शिक्षणामुळे मानवाला मानवासारखे समानतेच्या पायावर आधारीत जीवन जगण्याची संधी देते व त्यांच्यातील पशुत्व नाहीसे होते. प्राचिन काळापासून इतिहास तपासुन पाहिला तर कनिष्ठ जातीतील लोकांना शिक्षण घेण्याची मुभा नव्हती. त्यामुळे कनिष्ठ जातीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. समाजात बुरसटलेल्या चालीरिती, परंपरामुळे मानवी जीवन दूःखमय बनले होते. मात्र भारतात आलेल्या प्रबोधनाच्या लाटेतून शिक्षण घेणे मुलभुत अधिकार आहे, असा प्रचार प्रसार झाला. कुठल्याही देशाच्या विकासात शिक्षणाला अतिशय महत्व असते. ज्या देशातील नागरीक जास्त शिक्षित असतील त्या देशाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास झालेला दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेवून त्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला. "शिक्षण म्हणजे परिवर्तन" हे बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक विचारांचं मुख्य सुत्र होतं. गोरगरीबांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी बाबासाहेबांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. एवढयावरचं न थांबता शिक्षणासंबंधी लोकांमधे जनजागृती केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 नुसार चौदा वर्षांपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण दयावे अशी तरतुद केली. स्वातंत्र्य, समता, बंधूता शिक्षणामुळे ख-या अर्थाने नांदेल असा विश्वास बाबासाहेबांना वाटेले. शिक्षणामुळे गरीबी, अज्ञान, दारिद्रय या सर्वच बाबींवर यशस्वी मात करता येते. आज झालेली शिक्षण क्षेत्रातली प्रगती ही बाबासाहेबांच्याच कार्याचा परीपाक आहे.

Date of Online: 30 May 2014