Authors : प्रा डॉ. प्रशांत विनायक बुराडे
Page Nos : 402-408
Description :
सूर्यकुलातील पृथ्वी हा अतिशय महत्त्वाचा ग्रह आहे. व या ग्रहाचा वातावरण हा अविभाज्य आणि अतिशय महत्त्वाचा अंग आहे. पृथ्वी थंड होत असतांना सर्वप्रथम वातावरण निर्माण झाले व त्यानंतर पृथ्वीवरील इतर घटक निर्माण झाले. या वातावरणामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. पृथ्वीवर करोडो वर्षापासून पूर दुष्काळ, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, उल्कापात, वादळे यासारखी अनेक संकटे आलेली आहेत. परंतु आधुनिक काळात जागतिक तापमान वृद्धी हा भयंकर संकट आलेला आहे. या संकटामुळे फक्त मानवी जीवनच नाही तर संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टी ढवळून निघणार आहे. जागतिक तापमान वाढ ही मुख्यतः मानवाच्या अति हव्यासामुळे निर्माण झालेली समस्या आहे, व तीचे दुष्परीणाम संपूर्ण पृथ्वीला भोगावे लागणार आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे हवामाणावर कोणते परिणाम होतात व त्यावर कोणत्या उपाययोजना करावयास पाहिजेत याचे विश्लेषण या शोधपत्रात केलेले आहे.