Authors : विजया जितेंद्र राऊत
Page Nos : 246-250
Description :
नव्वदोत्तरी मराठी कवितेत निसर्ग व विज्ञान कवितांचा प्रवाह बळकट करणारे कविवर्य प्रा.आ.य. पवार हे एक प्रतिभासंपन्न कवी आहेत. त्यांनी काही ग्रामीण कथांचे लेखन केले असले तरी, कथेपेक्षा कवितेत त्यांना विशेष रुची आहे. विविध काव्यसंग्रहातून प्रसिद्ध झालेली आ.य. पवारांची ग्रामीण कविता बहूआयामी आहे. परंतु प्रस्तुतच्या माझ्या शोधनिबंधाचा विषय आ.य. पवारांची विज्ञान कविता हा आहे . गेल्या दहा-पंधरा वर्षात त्यांनी पन्नासहून विज्ञान कविता लिहिल्या. ऊनपाऊस (२०१३) धूळपेर(२०१८) आणि डॉ. वंदना लव्हाळे यांनी संपादित केलेल्या 'द्विदल ' या संग्रहात प्रसिद्ध झालेल्या आहेत.विज्ञान साहित्य किंवा कविता भविष्यवेधी असणे हा चमत्कार नसून त्या साहित्य प्रकाराचे एक ठळक लक्षण आहे . कवी पवारांची विज्ञान कविता भूतकाळावर उभी राहून भविष्यावर दुर्बिंण रोखते. गूढत्वाचा अचूक वेध घेते. असे असूनही तिच्या केंद्रस्थानी माणूसच असल्याचे दिसून येते. विध छंद -वृत्ते व प्रतिमा प्रतीकांनी नवनवीन आशयाचा माहोल कवेत घेऊन विज्ञान संकल्पनांचा झुला गगनगामी नेणारी पवारांची कविता स्वतंत्र वळणाची व प्रयोगशील आहे. त्यांच्या विज्ञान कवितेवर कोणत्याही काव्यप्रवाहाची छाप नाही.मराठीत दर्जेदार विज्ञान कविता दूर्मिळ आहेत. अशा मंदीच्या काळात पवारांच्या कवितेने विज्ञान कवितेला बळकटी देऊन विज्ञान कवितेच्या शुष्क प्रदेशात चैतन्य निर्माण केले आहे.