Authors : उज्वला तेजराम कापगते (हांडेकर)
Page Nos : 241-245
Description :
ग्रामीण क्षेत्राचा संपूर्ण विकास करून गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी देशात शासन स्तरावरून विविध कार्यक्रम व योजना हाती घेण्यात आल्या यात ग्राम विकासाकरीता गावात रस्त्यांची निर्मिती करून गावागावांना जोडुन ग्रामीण विकासाचे लक्ष प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारकडुन सूरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)या योजनेचा विशेषतत्वाने उल्लेख करावा लागेल. ग्रामीण भागात जवळपास 70 टक्के जनता निवास करते. देशातील एकून राष्ट्रीय उत्पन्नाचा जवळपास 40टक्के हिस्सा हा गावातून प्राप्त होत असते. त्यामुळेच देशांचा नियोजन बध्द व समुचीत विकास साधण्यासाठी ग्रामीण विकास साधने अंत्यत आवष्यक ठरते. ग्रामीण रस्ते हे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाची किल्ली आहेत. ग्रामीण विकासात रस्त्यांचे महत्वपूर्ण योगदान असते या योजनेचा मुख्य उद्देश हा दर्जेदार बारमाही रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रांना रस्त्यांची संपर्कता प्रदान करणे रस्त्यांची उपल्ब्धता करून गावाला होणाऱ्या सामाजिक आर्थिक लाभावर लक्ष केंद्रीत करून ग्रामीण क्षेत्रात रस्ते निर्माण प्रक्रियेवर विषेश जोर देण्यात आला. चांगल्या बारमाही रस्त्यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागांना रस्त्यांनी जोडणे हे व त्यंाच्यात संपर्क निर्माण करणे हा प्राथमिक उद्देश प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून संबधीत ग्रामीण क्षेत्रात बारमाही रस्त्यांची निर्मिती करण्यात आल्यामुळे शेती क्षेत्र रोजगाराची निर्मिती लोकांच्या जीवन स्तरात सूधारणा, आरोग्याच्या सूविधेत वाढ, ग्रामीण पर्यटनाला चालना ग्रामीण क्षेत्रात उच्च माध्यमीक तथा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येत मोठी भर पडलेली आहे त्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही ऐका गावाचा दूसऱ्या गावाशी तसेच गावाचा शहराशी बारमाही रस्त्याद्वारे संपर्क प्रदान करतांनाच ग्रामीण क्षेत्रातील लोकांच्या उथ्थांनासाठी मैलाचा दगड ठरली आहे.