Authors : स्वप्निल एस. बोबडेे व समित माहोरे
Page Nos : 231-240
Description :
महाराष्ट्र राज्य भारतातील एक महत्त्वपूर्ण राज्य असून त्याची निर्मिती 1 मे 1960 मध्ये झाली. तेव्हापासून महाराष्ट्र दिनाची सुरूवात झाली. महाराष्ट्रचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती असून महाराष्ट्र दक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे रूंद होत गेला असून त्याचे निमुळते टोक पुर्व भागातील गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रचा पुर्व-पष्चिम विस्तार हा दक्षिण-उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. शेतीच्या उत्पादकतेवरून शेतीच्या विकासाचा अंदाज घेता येतो. मागील 20 वर्षात एकूण तृणधान्य एकूण कडधान्य एकंदर एकूण अन्नधान्य आणि कापूस या नगदी विकाची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढलेली आहे. याचे श्रेय राज्यातील संस्था, संस्थात्मक व तांत्रिक सुधारणाच्या कार्यक्रमांना जाते. जमीनविशयक सुधारणा कार्यक्रम, शेतीचे यांत्रिकीकरण, नव्या शेती तंत्राचा वापर, सुधारित व संकरित बियाण्यांचा वापर, रासायनिक खतांचा वाढता उपयोग इत्यादी कारणाने राज्यातील कृषी उत्पादकता वाढलेली आहेत. तरीही इतर राज्यांच्या तुलनेत किंवा राष्ट्रीय सरासरीपेक्षा (भारत) कमी आहे. पारंपारिक पद्धतीने केली जाणारी शेती, शेतकऱ्याचे दारिद्र्या, कर्जबाजारीपणा, शेतीचे पावसावरील अवलंबित्व, नव्या तंत्राचा व यंत्राचा अपुरा वापर, या कारणांमुळे राज्यातील शेती उत्पादकता अल्प आहेत. शेतीची उत्पादकता कमी असण्याच्या कारणांचा व त्यावरील उपाययोजनांचा या संशोधन लेखात उल्लेख केलेला आहेत.