Authors : सुरेन्द्र पंढरीनाथ बोरडे व जे.एम. काकडे
Page Nos : 224-230
Description :
आंतरराश्ट्रीय विष्वात रेषीम उद्योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून महाराश्ट्रातील ग्रामीण भागातील जडण-घडणीत आणि महाराश्ट्राच्या आर्थिक विकासात टसर रेषीम उद्योगाचे महत्त्व वाढत चाललेले दिसून येत आहे. आज देषात व विदेषामध्ये सुद्धा टसर रेषीम कापडाची मागणी सातत्याने वाढत असल्याने टसर रेशीम उत्पादनाचे एक पारंपारिक कार्यापासून उद्योगाचे रुप धारण केलेले आहे. प्रस्तुत संशोधन लेखामध्ये महाराष्ट्रातील टसर रेशीम उद्योगाचा अभ्यास करणे, शासनाच्या विविध योजनाचा अभ्यास करणे व रोजगाराच्या संधी व भविष्यातील उपलब्धता याचा आढावा घेणे व उद्देश निष्चित करून त्या आधारे या उद्योगामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये थोडीफार रोजगार निर्मिती झाली आहे व हा उद्योग वन आधारित पुरक व्यवसाय आहे. अषी परिकल्पना मांडण्यात आली आहे.
प्रस्तुत संशोधन लेखातील उद्देशाला अनुसरून संषोधन लेखात रेशीम उद्योगाचा इतिहास व विकास, महाराष्ट्रातील टसर रेशीम उद्योगाची प्रगती तसेच या उद्योगाचा विकास व विस्तार होण्यासाठी शासनाच्या विविध योजनाचा आढावा घेवून ग्रामीण आर्थिक विकासामध्ये टसर उद्योगाची भुमिका याचा अभ्यास करण्यात आला आहे.