Authors : सोनाली डी. पारधी
Page Nos : 218-223
Description :
या शोध निबंधामध्ये किशोरांचे वर्तन व त्यावर परिणाम करणारे घटक यावर संशोधन करण्यात आले. पार्ष्वभूमीः विशिष्ट परिस्थितीमध्ये मुलांची होणारी प्रतिक्रीया म्हणजे वर्तन होय. किशोरावस्थेत अनेक शारिरीक बदल व हार्मोन्स परिवर्तन होतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये उदासीनता, बेचैनी, व्याग्रतांचे प्रमाण वाढते. मुलांच्या सर्वांगीण विकासात सकस व पर्याप्त आहार, निरोगी व उत्तम स्वास्थ आवष्यक असते. परंतु बरेचदा निरोगी असूनही किशोरावस्थेतील शरिरातील काही लैंगिक व मानसिक ग्रंथीमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा परिणाम मुलांवर होतो व त्यातून किशोरांचेे वर्तन घडून येते. पध्दतीः याकरीता चंद्रपूर जिल्ह्याातील 5 तालूक्यातील 15 ते 18 वयोगटातील 60 किशोरांची ज्यामध्ये 30 किशोर व 30 किशोरांचा यामध्ये समावेश करण्यात आला. साधनेः प्रस्तूत संशोधनात किशोरांचे वर्तन जाणूण घेण्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली. या प्रश्नावलीत किशोरांचे वर्तन व त्यावर परिणाम करणारे अंतर्गत, बहीर्गत घटक, त्यांच्या वर्तनावर होणारा आर्थिक, सामाजिक, तसेच शैक्षणिक घटकांचा परिणाम पाहण्यासाठी प्रष्नावलीचे 8 विभागात विभाजन करण्यात आले. न्यादर्षाची निवड करून निर्देशन सर्वेक्षण पद्धतीद्वारे किशोरांकडून प्रष्नावली भरून घेण्यात आली. निश्कर्शः या संशोधातून पालकांचे शिक्षण व किशोरांचे वर्तन यात सार्थक संबंध असल्याचे आढळून आले. कुटुंबातील सदस्य संख्या व किशोरांचे वर्तन यात सार्थक संबंध असल्याचे आढळून आले. कुटुंबाचा प्रकार व किशोरांचे वर्तन यात सार्थक संबंध असल्याचे आढळून आले.