Authors : सतिश ज. पिसे
Page Nos : 201-203
Description :
विकसीत, विकसनसित आणि अविकसीत देशामध्ये आता ग्रंथालय शास्त्र आणि ग्रंथपालन शास्त्र या दोन्ही संकल्पनाना मान्यता मिळालेली आहे, ग्रंथालया ऐवजी माहिती केंद्रे आणि ग्रंथालय सेवा ऐवजी माहिती सेवा या संज्ञा प्रचारात येत आहे. ग्रंथपाल आणि ग्रंथालयातिल सर्व कर्मचारी आधुनिक तं़त्रज्ञानाच्या साहयाने ग्रंथालयातिल दैनंदिन कामे पुर्ण करीत आहेत. माहितीच्या स्फोटापासुन ग्रंथालयात ज्ञानरूपी ग्रंथाची भर पळत आहे. अषा या ज्ञानाचे योग्य रित्या व्यवस्थापन करणे गरजेजे आहे. व्यवस्थापनाचा उदय व्यापार व उदयोग विभागात झाला. परंतू हळू हळू त्यानी ज्ञानाच्या सर्व शाखा व्यापलेल्या आपल्याला दिसून येतात. ग्रंथालय व्यवस्थानाचा विचार करता जागेचा, ईमारत आणि ईमारतीची रचना, सूर्य प्रकाश ग्रंथ आणि ग्रंथालयातील साहित्य, ग्रंथालय आपत्ती व्यावस्थापन, ग्रंथ खरेदीचे नियोजन इत्यादी. आजच्या आधुनिक काळात ग्रंथालयामध्ये संगणक आणि आज्ञावली यांचा वापर वाढल्यामुळे आणि गं्रथालयाला मिळणारे सरकारी अनुदान हे ग्रंथालयाच्या वर्गवारी नुसार असल्या कारणाने हे अनुदान फारच अल्प प्रमाणात असल्यामुळे हया बाबींचे व्यवस्थापन करणे हे ग्रंथपालाला अडचणीचे जाते, तरी पण तो आपल्या बुद्धी कौषल्याचा वापर करून योग्य व्यवस्थापन करतो.