Issue Description


Authors : सतीश शामराव खोब्रागडे व राजेश पी. कांबळे

Page Nos : 197-200

Description :
रमाई आवास योजनेचा विचार करता असे आढळून येते की, अनुसूचीत जातीतील कुटूंबांना हक्काचे घर मिळू लागले आहे. षासकिय अनुदानाचा योग्य वापर केल्यास आपल्या कुटूंबासाठी एक चांगले छोटेसे घर तयार होऊ शकते. शासकिय धोरण अधिकारी कर्मचारी व लाभार्थ्यांच्या अनास्थेमुळे बऱ्याच लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाचे बांधकाम पुर्ण केले नाही. याला विविध कारणे असले तरी शासनाचे अधिकारी अथवा शासकिय स्तरावरून लाभार्थ्यांची अनास्था दाखविली जाते हे काही प्रमाणत सत्य असले तरी पुर्ण सत्य वाटत नाही. लाभार्थ्यांच्या भेटीतुन अनेक सत्य बाहेर येतात. बरेच लाभार्थी अनुदानाच्या हप्त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारून-मारून थकलेले असतात. त्यामुळे नेमके म्हणणे कुणाचे खरे समजावे असा प्रष्न निर्माण होतो. तर काही अधिकारी सांगतात की, लाभार्थी घरकुलाच्या निधीची उचल करून तो निधी घरकुलाच्या बांधकामासाठी खर्च न करता आपल्या खाजगी कामासाठी खर्च करीत असतात. तर काही लाभार्थी स्वतःची कुवत व शासकिय निकशाला डावलुन आपल्या घरकुलाचे काम अवाजवी करतात. यामुळे त्यांना अनुदान निधी पुरत नाही. परिणामतः घरकुलाची कामे ही पुर्ण होत नाही. असे अनेक उदाहरणे पहावयाला मिळतात. असे असले तरी देखील ज्या उदात्त हेतुने हि योजना तयार केली आहे. या योजनेचा चांगला प्रभाव अनुसूचीत समाजातील बांधवांच्या कुटूंबाचा समाजिक आर्थीक दर्जा उंचावतांना दिसून येतो.

Date of Online: 30 May 2023