Authors : सतीश महादेवराव कर्णासे व कोमल वि. ठाकरे
Page Nos : 191-196
Description :
जीवनानुभव व्यक्त करण्याची क्षमता कविता, कथा, कादंबरी, नाटक इत्यादी साहित्य प्रकारात असते. परंतू कादंबरी हा साहित्य प्रकार अधिक लोकप्रिय व समाजा भिमुख असल्याचे आपणाला जाणवते. त्यानुसार समाजातील विविध प्रश्न, घडणाÚया घटना, जीवनातील समस्या त्याचे परिणाम कादंबरीकारावर होऊन तो आपल्या कादंबरी मधून मांडत असतो. अलीकडच्या काळात स्त्रिया शिक्षण, नोकरी यासाठी घराबाहेर पडल्या आणि आर्थिक दृष्ट्याा काही प्रमाणात का होईना त्या स्वावलंबी बनल्या हे जरी खरे असले तरी त्यांच्या पुढच्या समस्या कमी झालेल्या दिसत नाही. आज एकविसाव्या शतकात देखील विज्ञान - तंत्रज्ञानाच्या युगात समस्येत फारसा बदल झालेला दिसत नाही. संघर्षातून वेगवेगळîाा समस्या उभ्या राहतात. 1990 नंतरच्या साहित्य अकादेमी पुरस्कृत ‘झोंबी’, ‘झाडाझडती’,‘राघववेळ’,‘तणकट’,‘बारोमास’,‘फेसाटी’इत्यादी सर्वच कादंबÚयांमधून अशिक्षित वर्गाचे समाजातील विविध घटक शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक शोषण करतांना दिसतात. आर्थिक शोषणामुळे माणूस कसा हतबल होतो यावर या सर्वच कादंबÚया प्रकाश टाकतात.