Issue Description


Authors : राजेंद्र आ. मालेकर

Page Nos : 168-171

Description :
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती होय परंतु आज हा शेती व्यवसाय करण्याकरिता अनेक प्रकारच्या अडचणी शेतकऱ्याना येतात त्यातील अत्यंत महत्वाची समस्या म्हणजे शेतीसाठी लागणारे शेतमजूरांचा होणारा तुटवडा होय. याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील शेती ही विषिश्ट हंगामातच केली जातात आणि त्याच हंगामात शेतमजुर स्थलांतर होत असतात त्यामूळे शेतकऱ्याला शेतीच्या हंगाम किंवा मशाकत योग्य प्रकारे होवू शकत नाही आणि त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होतो. शेतीची मशागत जर योग्य वेळी योग्य प्रकारे झाली नाही तर शेतीमध्ये येणारे किंवा घेतल्या जाणाऱ्या पीकावर त्याचा परिणाम होत असतो. शेतकऱ्याला अनेक प्रकारच्या समस्या जाणवतात मग त्या नैसर्गिक असो वा मानवनिर्मीत समस्या असे परंतू मरतो शेतकरीच आणि अशा परिस्थितीत जेव्हा मजुराचा स्थलांतर झाले की शेतकरी शेतीची हंगाम बरोबर करू शकत नाही. शेतमजुराच्या समस्या शेतकऱ्यासमोर निर्माण होतात असे शेतमजुराचे अज्ञानपणा, त्यांच्या मजुरीबाबत समस्या, स्थानांतरणच्या समस्या, शेतमजुर व शेतकऱ्यामध्ये झालेला पक्षपातपणा, योग्य दर न मिळणे, मजुराच्या सुरक्षतेच्या समस्या, सरकारी योजने बाबत समस्या इत्यादी प्रकारच्या समस्या जातात परंतू त्यावर काही अष्या प्रकारच्या उपाय सुध्दा करता येतात जसे शेतमजुराला व शेतकऱ्याला प्रथम स्थान द्यावे, औद्योगीक क्षेत्रात योग्यतेनुसार भरती, शेतीसंबंधीत जोडधंदा, सुरक्षेतेच्या सोयी, पीकांवर त्याच ठिकाणी प्रक्रिया, योग्य दर आणि सरकारी योजणाचा प्रत्यक्ष लाभ या काही उपाययोजणा आखल्या तर मजुरांचा तुटवटा भासणार नाही. ग्रामीण भागातील शेतमजुरांचा शहराकडे स्थलांतरन होण्याचा कल, शेतीचे हंगामी स्वरूप, नियमित स्वरूपात रोजगार उपलब्ध करून देणे आवष्यक आहे.

Date of Online: 30 May 2023