Issue Description


Authors : प्रमोद नानाजी घ्यार व प्रतिभा रमेश पारखी

Page Nos : 158-161

Description :
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखालील चळवळीने महाराष्ट्राला जे नेते दिले त्यात दादासाहेबाचे स्थान अग्रभागी होते. डॉ. आंबेडकरांचा सर्व महत्वाच्या चळवळीत दादासाहेब सहभागी होते. दादासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते. व त्यांची भारतीय अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे बघण्याची स्वतःची दृष्टी होती. एका अर्थी ते बाबासाहेबांचे शिष्य होते. पण चिकित्सक दृष्टी असणारे मनातील शंकेचे निरसन होत नाही आपणास जो पर्यंत पटत नाही तो पर्यत प्रश्न विचारण भंडावणारे शिष्य पण एकदा शंकेचे निरसन झाल्यानंतर तन-मन-धनाने चळवळीत सामील होणार बाबासाहेबांचा शब्द खाली न पडू देणारे प्रसंगी जिवाचे रान करणारे जिवाला जीव देणारे. बाबासाहेबाच्या कार्यात सहभागी होऊन त्यांनी त्याच्या सामाजिक, राजकीय, कार्यात संघर्षाचा परमोच्च शिखर गाठण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी स्वतः चा विचार न करता आणि आपल्या कुटूंबाचा विचार न करता या दलित कुटुंबाचा विचार केला. त्याना येणार्या अडचणी कश्या प्रकारे दूर करता यावी याचाच विचार डोक्यात आणीत. त्यांनी दलितासाठी वेगवेगळ्या चळवळीत सहभागी होऊन त्यांना त्या अंधःकारण जिवनातून सुर्याचा प्रकाश दाखविणाचा प्रयत्न केला आहे. बाबासाहेबांनी सांगीतलेल्या प्रत्येक कार्यात विश्वासाने चिकाटीने धैर्याने ते कार्य पूर्णचास नेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना समाजाचा द्वेष पत्कारून त्यांनी दलितांना सर्व गोष्टीत न्याय मिळावा हेच त्याचे ध्येय होते. या दलितांना सर्वसामान्य सारखे जीवन जगता यावे यासाठी दादासाहेबाची धडपड होय. दादासाहेबांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्राणांची पर्वा न करता किंवा कोणताही विचार न करता सतत झटत राहीले. डॉ बाबासाहेबाच्या प्रत्येक कार्यात सहभाग दाखविण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. दलितांना शिक्षणात, समाजात, राजकीय कार्यात हक मिळावा यासाठी त्यांनी केलेल्या चळवळीत मनापासून आणि चिकाटीने प्रयत्न केला. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी सामाजिक कार्यातूनच विविध पातळीवर केलेले संघर्ष किंवा चळवळी या त्यांच्या सामाजिक अस्पृश्यांना मिळालेली विकासाची विजयाची साक्ष होती. या सर्व गोष्टीमधूनच सामाजिक चळवळी बरोबर राजकीय कृतीचे चांगल्या प्रकारे विकास करता येते, असे त्यांना वाटत होते.

Date of Online: 30 May 2023