Issue Description


Authors : प्रणाली शेंडे व संतोष अ. कावरे

Page Nos : 154-157

Description :
भारतीय समाजात अनादी काळापासून पुरूष आणि महिला यांच्या कार्याची विभागणी झालेली दिसून येते. श्रमविभाजनामुळे जास्तीत जास्त प्रमाणात महिलांना कौटूंबिक कार्य वाटयास आल्याचे दिसते. भारतात असलेल्या आदिवासी जमातीमध्ये बहुतांश जमाती या पितृसत्ताक व्यवस्था असणाऱ्या आहेत. आज घडीला खासी, गारो, नायर या जामतीत मातृसत्ताक व्यवस्था असणाऱ्या असल्या तरी मात्र प्रगत समाजाच्या संपर्कामुळे त्यांच्यावरही पितृसत्ताक जीवनपध्द्तीचा प्रभाव दिसून येतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने लोकशाही व्यवस्था स्विकारून भारतातील वंचित, दुर्बल अषा सर्व तळागळातील समाजाचा विकास साध्य करण्याच्या हेतूने अनेक कल्याणकारी योजना राबविण्यास सुरूवात केली. त्यास आदिम समाजही अपवाद नाही. वर्षानुवर्ष प्रगत समाजापासून दुर असलेला आणि अनेक अनिश्ठ रूढी, प्रथा, परंपरा आणि पारंपारीक जिवन जगणाऱ्या आदिवासी समाजाचा सुध्दा विकास साध्य करून त्यांना आधुनिक समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या दृश्टीने प्रयत्न झाले आणि ते आजतागायत सुरू आहे. भारतीय समाजाप्रमाणे आदिवासी समाजात सुध्दा स्त्री आणि पुरूशांचे प्रमाण बरोबरीचे आहे. तेव्हा या दोनही घटकांचा विकास साधण्याबरोबरच विषेशतः महिलांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, षैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात केवळ पुरूशानाच नव्हे तर महिलांना सुध्दा आधिकाधिक प्रवेष कसा देता येईल या दृश्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही कुटूंबाचा गावाचा राज्याचा आणि देशाचा सर्वांगिण विकास साध्य करायचा असेल तर आदिवासी महिलांचे सक्षमीकरण होणे काळाजी गरज आहे आणि म्हणून सकल आदिवासी विकासात महिला सक्षमीकरणाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे.

Date of Online: 30 May 2023