Authors : पिपल मोरेश्वर खोब्रागडे व डी. टी. गजभिये
Page Nos : 140-143
Description :
भारतीय समाज व्यवस्था मुळातच भेदभाव, विषमता, घृणाभाव, यावर आधारीत असल्याने स्वच्छतेचे काम पुर्वपार चालत आलेल्या परंपरेनूसार महार, मांग, मेहतर, भंगी, वाल्मीकी, लालबेगी या जातीवरच सोपविण्यात आले. चंद्रपूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा याच जातीचे लोक सफाईचे काम करतात. आरोग्यास व जीवीतास हानिकारक असूनही त्यांनी अमानविय व अमानुष अशा या कामाचा स्विकार केला आहे. कामाच्या ठिकाणी सुविधांचा अभाव, तुटपुंज्या सुविधा असुनही स्वत:चा जीव धोक्यात घालून चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसाठी, नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी सकाळपासून राबत असतात, म्हणुनच सफाई कामगार खऱ्या अर्थाने चंद्रपूर शहराचे आरोग्यदूत, स्वच्छतादूत आहेत. इतरांच्या आरोग्यासाठी राबणाऱ्या या वर्गाची सामाजिक व आर्थिकस्थिती मात्र फारसी चांगली नाही. सतत घाणीच्या ठिकाणी काम करावे लागत असल्याने असंख्य आजारांनी त्यांना ग्रासले आहे. सार्वजनीक जीवनात भेदभावपूर्ण व्यवहारास तोंड द्यावे लागते. सतत अस्वच्छ ठिकाणी काम करावे लागत असल्याने अनेक सफाई कामगार नशेच्या आहारी गेले आहेत. त्यातून व्यसन व कर्जबाजारीचे प्रमाण वाढले आहे. शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. या वर्गातील स्त्रीयांना आजही अनेक सामाजिक समस्यांना तोंड दयावे लागते आहे, अलीकडे सफाईकामगार आपल्या भविष्याविषयी जागृत होत आहेत. नव्या वाटा चोखाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याची गती मात्र अतिशय संथ आहे.