Issue Description


Authors : पी. एन वाघ व अरुण तुकाराम कोडापे

Page Nos : 133-139

Description :
आदिवासी चा सरळ सोपा अर्थ आदि म्हणजे पूर्वी पासुन वासी म्हणजे रहिवासी किंवा वास्तव्य करुन राहणारा समाज होय. अश्या या आदिवासी जमातीचे गडचिरोली जिल्हयात प्रमाणजास्त आहे. जिल्हयातील एकुण लोकसंख्येच्या तुलनेत 38.17 टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जामतीची आहे. त्यामुळे आदिवासींची जिल्हा अशी ओळख सूपर्ण राज्यात गडचिरोलीची आहे. जिल्हयातील आदिवासिंच्या धार्मिकते संदर्भात संशोधन केले असता आढळून येणारी महत्वाची बाब म्हणजे, शहरातील राहणाऱ्या नवीन पिठीत इतर धर्माबददलची आस्था वाढलेली दिसुन येत आहे. ग्रामिण व आदिवासी बहुल क्षेत्रात येणारे शहरीभागातील नौकरदार वर्ग, ठेकेदार, व्यावसायिक यांच्या सोबतच्या संपर्कातून त्यांच्या धर्माचा प्रभाव आदिवासी समाजावर पडुन हिंदु व इतर धर्मियांच्या चालरीती व पुजा अर्चणामध्ये शहरातील लोकांप्रमाणे बदल घडून आल्याचे लक्षात येते.

Date of Online: 30 May 2023