Authors : जी. के. जीभकाटे व विनोद मन्साराम बडवाईक
Page Nos : 127-129
Description :
भारत हा कृषिप्रधान देश असून आजही 70% जनता ही कृषीक्षेत्रावर निर्भर आहे. कृषि क्षेत्रामधून विविध उद्योगांना लागणारा कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. भारतातील ग्रामीण भाग हा पूर्णपणे शेतीवर आणि शेतमजुरीवरच आपली उपजीविका चालवित असतो. ग्रामीण भागामध्ये पुरुषाच्या तुलनेत महिला शेतीमध्ये अधिकांश प्रमाणात काम करताना दिसून येतात त्यामुळेच कृषिक्षेत्रांमध्ये महिला श्रमिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने विचार करता स्त्री श्रमिकांच्या एकूणच समस्येचा तसेच त्यांच्या कृषि क्षेत्रांमधील भूमिकेचा यथायोग्य अध्ययन करण्याचा प्रयत्न या शोधप्रबंधामध्ये करण्यात आलेला आहे. सामान्यत: आर्थिक मोबदला घेऊन जो मजूर (स्त्री अथवा पुरुष) शेतावर काम करतो त्याला शेतमजूर असे म्हणतात. फक्त शेती व्यवसायाचे काम करणारेच नाही तर शेती व्यवसायाशी संबंधित इतर व्यवसायामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीचा देखील समावेश शेतमजुरांमध्ये करण्यात येतो. शेतीमध्ये बि-बियाण्याची पेरणी करणे, निदन करणे, कपाशी वेचने, पिकाची कापणी करणे इत्यादी कामे स्त्री शेतमजूर योग्य प्रकारे करू शकते. तसेच स्त्री शेतमजुर ही आपल्या कामात हयगय करीत नाही त्यामुळे कृषिच्या एकूणच उत्पादनात स्त्री शेतमजुरांची भूमिकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ग्रामीण भागातील पुरुष कामाच्या शोधात शहरांमध्ये जातात त्यामुळे ग्रामीण स्त्रीवर कुटुंबाचा भार पडतो त्यामुळे त्या कुटुंबाला आधार म्हणून शेतमजुरी करून उपजीविका करतात. अशा स्त्रियांना संधी विस्तार सेवा आणि कृषि प्रशिक्षण देऊन भविष्यातील विकास धोरण ठरवणे आवश्यक आहे. अनेक विकसनशील देशांमध्ये सरासरी 43 टक्के महिला कृषिक्षेत्रामथ्ये मजूरीचे काम करतात.