Issue Description


Authors : दिपाली एच. पंधरे व नथ्थु एस. गिरडे

Page Nos : 122-126

Description :
इ.स. 19 व्या शतकामध्ये भारतावर प्रामुख्याने ब्रिटिशांचे राज्य होते. मुघलांचे राज्य गेल्यानंतर भारतावर इंग्रजांचे साम्राज्य सुरू झाले. ‘व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले’ या उक्तिप्रमाणे ब्रिटिशांनी भारतावर जवळपास 200 वर्षे राज्य केले. याच वेळी व्यक्तिस्वातंन्न्य, समानता, लोकशाही, उदारमतवाद इत्यादी युरोपला हलवून सोडणाऱ्या नवविचारांचे प्रवाह इंग्रजी भाषेच्या मदतीने आपल्याकडे वाहू लागले. मुघलकाळात तसेच ब्रिटिषकाळात भारतीय स्त्रियांची स्थिती व स्थान हे दुय्यम दर्जाचे होते. या काळात प्रामुख्याने बालविवाह, सतीप्रथा, विधवा विवाहास विरोध, हुंडापध्दती या अनिष्ट प्रथा रूढ होत्या. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान नव्हते. देषाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास ब्रिटिष सत्तेच्या हातात होता. स्त्री आत्मनिर्भर नसल्यामुळे व पुरूषप्रधान संस्कृतिमुळे तिला स्वतःची निर्णय घेण्याची मुभा देण्यात आलेली नव्हती. पुरूषांच्या अटींच्या अधीन राहूनच आचरण ठेवावे लागत होते. समाजात फक्त ‘चूल आणि मूल‘ एवढेच कार्य मर्यादित होते. भारताला ब्रिटिषांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंन्न्य विरांनी आपल्या घरावर तुळषीपत्र ठेवून भारताला स्वातंन्न्य मिळवून दिले.या पुरुशांच्या संसाराला सावरण्याचे कार्य स्त्रियांनी केलेत. 1997 ते 1998 हे भारताच्या स्वातंन्न्याच्या सुवर्ण महोत्सवाचे वर्श होते. परंतु स्वातंन्न्य मिळाल्यापासून गेली पन्नास वर्शे स्वातंन्न्य लढयात व स्त्री सुधारणेत असलेल्या महिलांच्या कामगिरीकडे सतत दुर्लक्ष झालेले आहे. म्हणूनच थोर पुरुषांप्रमाणे समाजातील सर्व थरांतील महिलांनी स्त्री सुधारणेत केलेल्या कामगिरीचा आढावा यामध्ये घेण्यात आलेला आहे. भारतीय महिलांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देवून त्यांना मुलभूत हक्क प्राप्त करून देणे, महिलांना षिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून षिक्षणाचे अधिकार मिळवून देणे, महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक कार्यात सहभाग वाढविणे, महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविणे यासाठी वसाहतकाळात सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू, पंडिता रमाबाई सरस्वती इत्यादी स्त्री समाज सुधारकांनी पुढाकार घेऊन मोलाचे प्रयत्न केलेत.

Date of Online: 30 May 2023