Authors : दिलीप भिमराव मेंढे
Page Nos : 117-121
Description :
शेती हा भारतीय लोकांचा प्राचीन व्यवसाय आहे. भारताचे 65 टक्के लोक अजुनही शेतीपूरक व्यवसायावर अवलंबुन आहे. नैसर्गीक साधनसामुग्री व कमी भांडवलावर हा व्यवसाय करता येतो परंतु स्वातं०याच्या 75 वर्शानंतर सुध्दा कृषिप्रधान आपल्या देशात शेती व्यवसायाच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही. वाढते कर्ज कृषि उत्पादनाचा वाढता लागत खर्च उत्पादनाला मिळणारा अपर्याप्त हमीभाव आणि नैसर्गीक संकट, दुश्काळ, अतिवृश्टी, महापुर, किडरोगाचा प्रकोप इत्यादी कारणांमुळे षेतीव्यवसायाची स्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. देषात विकासाच्या 12 पंचवार्शीक योजना राबवून सुध्दा शेती व्यवसायाला बळकटी व स्थिरता प्राप्त झाली नाही. अलाभकारी आणि अपुÚया शेती उत्पादनाच्या परतव्यामुळे छोटे शेतकरी आणि शेतमजुर आपला शेती व्यवसाय सोडून अन्य क्षेत्रात रोजगार शोधत आहेत. त्यातच अनेक पुंजीपती कृशि उपयोगी जमीनी स्वस्त किंमतीला खरेदी करुन भुखंड विक्रीच्या व्यवसायातून भरपुर पैसा कमावत आहे. षेतकÚयाच्या जमीन विक्रीच्या समस्येमुळे भविश्यात देशाच्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा तुटवडा पडण्याची भिती निर्माण झालेली आहे.