Authors : धनराज डी. मुरकुटे
Page Nos : 113-116
Description :
राश्ट्रसंत तुकडोजींचा जन्म अमरावती जिल्हयातील यावली या खेडेगावी झाला. त्यांनी आपले पुर्ण आयुश्य देषासाठी अर्पण केले. तुकडोजी महाराजांनी देषामध्ये बंधुभाव, समानतेची आणि राश्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करण्याचे कार्य केले. 1942 च्या स्वातंत्र्य लढयात ऊडी घेऊन भजन, किर्तन व भाशणांच्या माध्यमातून लोकांना जागृत करीत देषाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांना संघठीत करण्याचे कार्य केले. राश्ट्रासाठी तुकडोजी महारांजानी नागपूर व रायपुरच्या जेलमध्ये 100 दिवस तुरूंगवास भोगला. त्यांच्या कार्य कर्तुत्वामुळे भारताचे तत्कालीन राश्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राश्ट्रसंत या पदवीने गौरवीले. 1962 ला चीन सारख्या बलाढय राश्ट्राला आव्हान करीत, सिमेवरील सैंनिकी षाळेतील सैनीकांमध्ये क्रांतीची ज्वाला भडकावीली. देषामध्ये राश्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे कार्य तुकडोजीने केले.