Authors : भारती खापेकर व रोशनी गणेशराव घोडमारे(गतफणे)
Page Nos : 102-107
Description :
कथा हा साहित्यप्रकार काव्याइतकाच प्राचीन आहे. कथा वाऽ्मयाचा परिचय आपल्याला बाल्यावस्थेत कथाश्रवणाने होतो. कथा हा वाऽ्मय प्रकार लहाणापासून वयोवृध्दापर्यंत सर्वांना आवडतो. लहानपणी मनोरंजनासाठी, तारूण्यात उपदेषासाठी आणि वृध्दावस्थेमध्ये सुखाने वेळ घालविण्साठी कथाकथनाचे श्रवण केले जाते. बालपणी आईने सांगितेलेल्या चिऊकाऊच्या भाशेपासून ते तत्वज्ञानाची भाशा सारख्याच मनोरंजकतेने बोलण्याचे सामथ्र्य केवळ कथेजवळ आहे. केवळ स्त्रीकथाकार म्हणूनच नव्हे तर समग्र मराठी साहित्य परंपरेत ज्यांचे स्थान लक्षणीय आहे, अषा काही मोजक्या कथालेखकांत ‘प्रतिमा इंगोले’ यांचा समावेश करावा लागेल. त्यांचे लेखन नुसते स्त्रीप्रधानच नव्हे तर समकालीनतेशी घट्ट सांधा असलेले आणि वाचकाला आत्मशोध व आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. प्रतिमा इंगोले यांच्या बहुतेक कथा स्त्रीकेंद्री आहेत. त्यांनी आपल्या कथांतून वऱ्हाडी ग्रामीण स्त्रीचे जीवन साकार केले आहे, पण या स्त्रीयांच्या व्यथा-वेदनांचे स्वर अखिल स्त्रीजातीच्या दुःखापेक्षा वेगळे नाही. तर प्रदेश चित्रणाच्या दृश्टीने स्त्रीकेंद्रित अनुभव त्यातून व्यक्त झाले आहे. लोकपरंपरेचा स्वीकार करणारी स्त्री व तिची भावावस्था त्यांनी दर्षविली आहे. गरीब शेतमजूर स्त्रीची अवस्था निखळ वऱ्हाडी भाषेतून प्रकट केली आहे. या कथांच्या वाचनाने आपली स्त्रीयां विषयीची व भोवतालच्या समाजा विषयीची समजूत अधिक प्रगल्भ होईल या उद्देशाने प्रस्तुत शोधनिबंधामध्ये प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेल्या निवडक कथासंग्रहातील स्त्रीचित्रणावर चर्चा करण्यात आलेली आहे.