Authors : अशोक तुकाराम खोब्रागडे
Page Nos : 97-101
Description :
मानवाधिकाराचा संबंध मानवाच्या व्यक्तित्व व सर्वांगिण विकासाशी जुडलेला आहे. अर्थात विविध राष्ट्रांना असा अधिकार प्रदान करण्याची आहे कि, ज्याचा उपयोग करून प्रत्येक राष्ट्र आपल्या विकासाला गतिशील बनवेल. कोणत्याही देश अथवा प्रदेशाच्या राजकीय परिस्थिती बाबत भेदभाव न करता विशेषतः शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमधून मानवाधिकराचा प्रचार, प्रसार, वाचन आणि चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे.
मानवाधिकारासंबंधी जागतीक स्तरावर विविध सम्मेलने व चर्चा होत असली तरी मानवाधिकार अजूनपर्यंत समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. आजही समाजामध्ये धर्म, वंश, जात, लिंग अणि जन्मस्थान इ. च्या आधारावर भेदभाव केल्या जातो. महिलांवरील अत्याचारात तर मागील काही दशकांपासून सतत वाढ होत आहे. महिलांवरील अत्याचार, बलात्कार, लैंगिक छळ प्रामुख्याने सार्वजनिक तसेच काम करण्याच्या ठिकाणी वाढत जात आहे. महिलांना सशक्त बनविणे आज सर्वात महत्वपूर्ण मुद्दा आहे. त्यांना सशक्त बनविण्याची सर्वात कार्यक्षम पध्दत त्यांना कायदेशीर अधिकारांची माहिती देणे आहे. त्यामुळे ते कायदयाने त्यांना किती संरक्षण दिले आहे? तसेच काद्याद्वारे ते कोणकोणते अधिकार प्राप्त करू शकतात. अन्याय, अत्याचार तसेच शोषणाचा विरोध कशा करू शकतील? याची जाणीव होईल. ही सर्व माहीती मिळविण्यासाठी महिलांना मानवाधिकार शिक्षेची अत्यंत आवष्यकता आहे. महिलांसोबतच समाजामध्ये बालकांच्या अधिकारावर सुध्दा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. बालकांना शिक्षणापासुन वंचित ठेवणे, कारखाने, खानावळ किंवा इतर धोकादायक कामावर त्यांना ठेवणे, त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे इ. कृत्य समाजामध्ये बालकांविरूध्द होत आहे. विकलांग मुलांना तर अतोनात शारीरिक पिडा सहन करावी लागते. कधी-कधी तर त्यांना बेघर सुध्दा केले जाते. अषा प्रकारचे छळ थांबविण्यासाठी व महिला तसेच बालकांच्या हित संरक्षणासाठी मानवाधिकार शिक्षेची नितांत गरज आहे.