Authors : आशिष रामदास देरकर
Page Nos : 92-96
Description :
ब्रिटीश राजवटीत देशातील शेतकाऱ्यांचे मोठ्याप्रमाणात शोषण होत होते. लोकमान्य टिळकांनी सन1895-96 मध्ये त्यांच्या केसरी या वृत्तपत्रामध्ये शेती व शेतकाऱ्यांविषयी अनेक लेख प्रकाशित केले आहे. शेतकाऱ्यांच्या विविध प्रष्नांवर त्यांनी सुमारे 127 वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार आज एकविसाव्या शतकातही तंतोतंत लागू पडणारे आहे. त्यांनी त्या काळातील शेतकÚयांच्या नेमक्या समस्या ओळखल्या होत्या. सर्वसामान्य शेतकाऱ्यांना व नागरिकांना समजेल अशा शब्दात त्या समस्या व उपायांची मांडणी लोकमान्य टिळकांनी आपल्या लेखणीतून केली होती.
टिळकांचे शेतीविषयक विचार बघितल्यास दुष्काळाच्या काळातले ‘केसरी‘चे सगळेच अंक शेतकाऱ्यांच्या समस्या व उपायांनी भरलेले आहेत. ब्रिटीष सरकारचे धोरण शेतकाऱ्यांच्या हिताचे नव्हते. या काळात शेतकरी वर्ग त्यांच्या समस्यांची पत्रे लोकमान्य टिळकांना पाठवून त्या सोडवण्यासाठी काय करावे? या प्रष्नाचे उत्तर टिळकांकडून अग्रलेखातून मिळवित होते. आपल्या हक्काचे ओरडून, भांडून, सरकारकडून मागून घ्या, असे सांगून टिळक केसरीतून शेतकाऱ्यांची जनजागृती करीत होते. कृशिप्रधान अर्थव्यवस्थेत शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेती आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या दुष्काळाचा प्रश्न निवारण्यासाठी टिळकांनी केलेली जनजागृती शेतकाऱ्यांसाठी आजही गरजेची असून दुर्लक्ष करण्यासारखी नाही. म्हणून लोकमान्य टिळकांचे कृषीविषयक विचार अभ्यासणे महत्वाचे ठरणार आहे.