Issue Description


Authors : राजेष शंकरराव पत्तीवार

Page Nos : 452-455

Description :
कोविड -19 या जागतिक महामारीचा संपुर्ण मानव जातीवर कधी नव्हे इतका प्रचंड परिणाम झाला आहे. मानवाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व षैक्षणिक अंगावर त्याचा फार मोटा प्रभाव पडला आहे हे आपण आजही अनुभवतो आहे. सर्वच क्षेत्राबरोबर षैक्षणिक क्षेत्राचे यात अपरिमित नुकसान झालेले आहे व याचा परिणाम येणाÚया काळात दिसू लागणार आहे. या दोन वर्शाच्या कालखंडात अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रचलित पध्दतीत आमुलाग्र बदल घडवून गेला आहे. षैक्षणिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व संप्रेशण तंत्रज्ञानाच्या उपलब्धता आणि वापर तसेच षिक्षकांची या तंत्रज्ञानाप्रती असलेली अभिवृत्ती या दोन्ही मुळे विद्याथ्र्यांच्या ज्ञानार्जनामध्ये व अध्यापकांच्या अध्यापनामध्ये बदल घडलेला आहे. कोविड बंद च्या परिस्थितीत षिक्षक, विद्यार्थी, षाळा व समाज यांनी षिक्षणाच्या अडचणींवर मात करीत संप्रेशण व माहिती तत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे अध्ययन-अध्यापनाचे कार्य पुढे नेले आहे यात दुमत नाही. पारंपरिक पध्दतीत असलेली षिक्षक-विद्यार्थी यांच्यातील थेट संबंध व एकतानता नसतांना ते एकमेकांपासून लांब असतांना अध्ययन अध्यापनाचे कार्य अत्यंत योग्य पध्दतीने व चांगल्या प्रकारे केल्या गेले हे सर्व जगाने अनुभवले आहे. यावरून संप्रेशण व माहिती तंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित होते. आज कोविड -19 पष्चात अध्ययन व अध्यापन प्रभावी करण्यासाठी षैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजेच संप्रशण व माहिती तं़त्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू झालेला आढळतो. इतके दिवस या सर्वापासून दुर असलेली मुले अत्यंत दुर्गम भागात वास्तव्यास असलेले षिक्षक आणि विद्यार्थी देखील यापुढे माहिती व संप्रेशण तंत्रज्ञानाच्या वापराषिवय राहू षकत नाही याची प्रचिती क्षणाक्षणाला येत आहे. त्यामुळे विद्यार्थी तंत्रज्ञान स्नेही असतांना संपुर्ण माहिती एक कळ दाबुन मिळत असतांना षिक्षकाने देखील तयारीत असले पाहिजे. त्याला या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी व अध्ययन अध्यापनात टिकुन राहण्यासाठी षैक्षणिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, आणि संप्रेशण तंत्रज्ञान यात प्रभुत्व मिळविले पाहिजे.

Date of Online: 30 Jan 2023