Authors : प्रविण अ. उपरे
Page Nos : 445-451
Description :
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकोत्तर पुरूश होते. त्यांनी केलेले कार्य हे संपूर्ण देषासाठी अजोड स्वरूपाचे आहे. त्यांचे विविध विशयावर प्रभुत्व असून समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कृशी, धर्म, संस्कृती, कामगार व षेती या सर्व विशयावर सखोल चिंतन करून दुर्गामी विचार मांडला. ते कायदेपंडीत, घटनाकार, इतिहासकार, अर्थषास्त्रज्ञ, षिक्षणतज्ञ, मुत्सद्दी पत्रकार, महान समाज सुधारक, उत्कृश्ट संसदपटटू अषा चतुरस्त्र भूमिकांमधून भारतीयासह विदेषी लोक सुध्दा त्यांचा गौरव करतात. त्यामुळे सर्वच जगच प्रभावित होवून त्यांची प्रेरणा घेतात. त्यांचे विचार कृतिषिल असून काळाच्या पुढे नेणारे होते. सामाजिक समतेवर आधारीत समाजव्यवस्थेची निर्मिती व्हावी, उपेक्षितांना न्याय आणि सन्मान मिळवण्यासाठी डाॅ. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुश्य खर्ची घातले. त्यांच्या दृश्टीने षिक्षणाला अनन्य साधारण महत्व होते, बाबासाहेबांनी दिलेल्या ‘षिका व संघटीत व्हा व संघर्श करा’ या मुलमंत्राने प्रेरीत होऊन कोटयावधी समाजबांधव सक्षम व समर्थ झाले. बाबासाहेबांचे अनेक पैलू लोकांसमोर आहेत. संघर्शषील समाज, का्रंतीकारक विचावंत, व्यासंगिक अभ्यासक, दुरदृश्टीचा नेता, थोर जलतज्ञ, विधीविचारक, प्रबोधन देणा-या जाणिवेचा लेखक अषा अनेक पैलू पैकी काही दुरलक्षीत राहिले आहेत.
डाॅ. बाबासाहेब यांच्या पत्रकारितेला 1920 मध्ये प्रारंभ झाला. समाजाने निर्माण केलेल्या दृश्टचक्रातून अस्पृष्य वर्गाला कसे बाहेर काढावे याचा ध्यास त्यांना लागला होता. आजची पत्रकारीता हा व्यवसाय झाला आहे. लोकसभा, विधिमंडळ, न्यायपालिका व प्रषासन हे भारतीय लोकषाहीचे तीन आधारस्तंभ आहेत. चैथा आधारस्तंभ वृतपत्राला मानले जाते. मात्र स्वातंत्र चळवळीतील वृतपत्र स्वातंत्र्य लढयाला अनुसरून पत्रकारिता, प्रसारमाध्यमे हे लोकषाहीचा आवाज उठवतिल, तिचे संरक्षक बनून अन्यायाविरोधात आवाज उठवतील, जनहक्काचे संरक्षण करतील असे बाबासाहेबांना अभिप्रेत होते.