Issue Description


Authors : प्रज्ञा एस. जुनघरे

Page Nos : 441-444

Description :
‘‘आरोग्य हीच संपत्ती’’ सकस आहारामूळे मानवाची कार्यक्षमता वाढून षारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यास मदत होते. निरोगी जिवन जगणे हा प्रत्येक मानवाचा मुलभूत हक्क आहे हे तत्व जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राश्ट्रसंघ यांनी मान्य केले आहे राश्ट्रातील प्रत्येक नागरीकांचे आरोग्य उत्तम असल्यास त्यांच्या सर्वागीण विकासात बाधा निर्माण होणार नाही. ‘‘उत्तम आहार उत्तम आरोग्याचे समीकरण’’ आहे. आधूनिक जीवन षैलीचे बारकाईने निरिक्षण व अवलोकन केल्यास असे आढळून येते की हल्ली युवकांमध्ये फास्ट फूडचे प्रचंड आकर्शण निर्माण झाले आहे फास्टफूड म्हणजे ‘‘रेडी टू इट’’. युवकांना फास्टफूडचे वेड लागले आहे. तरूणपीढी फास्टफुडच्या आहारी गेली आहे. चमचमीत, चटकदार, चरबीयुक्त, मसालेदार स्वादीश्ट व रूचकर फास्ट फूडचा मनसोक्त आस्वाद घेणे युवकांना आवडते कारण त्यांना त्यामुळे विषेश आनंद मिळतो. फास्ट फुडचे सेवन करणे प्रतिश्ठेची बाब समजली जाते. प्रतिश्ठा आणि फॅषन आहे म्हणून फास्टफूड घेतले तर काही क्षणासाठी आनंद मिळतो पण त्याचा आरोग्यावर होणारा दुश्परिणाम याची षक्यता नाकारता येत नाही तरीही युवावर्ग याला वारंवार बळी पडतो. आरोग्याकरीता अपायकारक हानीकारक असलेले फास्टफूड षरीरावर त्याचे होणारे दुश्परिणाम याबाबत युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व त्यांची मानसिकता बदलविण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. युवकांना व समाजाला फास्टफूड चे दृश्परिणाम लक्षात आणून देणे हा या संषोधनाचा मुख्य उद्देष आहे.

Date of Online: 30 Jan 2023