Issue Description


Authors : मधुकर नक्षीणे

Page Nos : 436-440

Description :
सहकार या शब्दात एकूण दोन शब्द आहेत. एक सह म्हणजे एकत्र व दुसरा कार म्हणजे काम करणे. यावरुन सहकाराचा साधा अर्थ एकत्र काम करणे होय. सहकारी संस्थेत येणारे लोक आपल्या समान गरजा भागविण्यासाठी येत असून त्यांच्यात काटकसर, स्वावलंबन, परस्पर सहाय्य आणि स्वार्थ, त्याग इत्यादी चांगल्या गोष्टीचा अतंभाव असतेा. उपरोक्त गुण असणारी व्यक्ती आर्थिक, सामाजिक व नैतीक ध्येयासाठी स्वखुशीने एकत्र आलेले असतात. समान हक्क, समान दर्जा व नफा, तोटयाची योग्य वाटणी ही तत्वे मान्य करुन सहकारी संस्थांची निर्मिती झालेली असते. सहकार ही यशस्वी जिवनाची गुरुकिल्ली आहे. सहकार ही केवळ मानवी नव्हे तर पशुपक्षा पासूनची प्रवृत्ती आहे.. पशुपक्षी सुध्दा कळप करुन राहतात. मानव सुध्दा त्यांच्या पशुतुल्य अवस्थेत थवेच्या थवे करुन राहत होते. संरक्षणा करिता व स्वविकासाकरिता सहकारा शिवाय उध्दार नाही तसेच ”बिना सहकार नही उध्दार“ अशी हिंदीत म्हण प्रचलित आहे. प्रा. मोहमद युनुसयांनी बांगला देशामध्ये गरीबातील गरीब व्यक्तीला तसेच दारिद्रय रेषेखाली असणाÚया गरीब व्यक्तीला मदत करण्याच्या दृष्टीने मिनी बॅंक, पत संस्था तसेच बचत गटाची निर्मिती करुन त्यांना सुक्ष्म पत पुरवठा करुन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले त्यामुळे त्यांना अविस्मरणीय कार्य केल्याबद्यल आंतरराष्ट्रीय नोबल पुरस्कार सुध्दा मिळालेला आहे. सर्व सामान्य नागरिक अथवा जनता बॅंके पर्यंत त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता पोहचू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहात सर्व साधारण लोक येत नाहीत. परंतु नागरी पत संस्थांच्या निर्मितीमुळे सर्व साधारण व्यक्ती सुध्दा आपला विकास साधण्याचा निश्चित प्रर्यत्न करतो व राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहात येवून आपला विकास साध्य करतो. सहकार उद्येशाप्रमाणे व सहकार तत्वानी नागरी पत संस्थाच्या परिसरात राहत असणाÚया जनतेला अर्थ सहाय्यकरुन त्यांचा विकास केलो जातो. 21 व्या शतकाच्या देशात सहकारी पत संस्थानी आपली फार मोठी ओळख निर्माण केली. प्राथमिक कृषी पत संस्था, जिल्हा मध्यवर्ती बॅॅंका, राज्य सहकारी बॅंका आणि दिर्घकालीन वित्तपुरवठा करणाÚया राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बॅंका व पत सस्था मुख्यता अस्तीत्वात आल्यात. स्वातंत्र्योत्तर काळात बॅंक व्यवसायाच्या विकासासाठी तसेच पत संस्थाच्या विकास धोरणाबाबत शासनानी फार मोठया प्रमाणात पर्यत्न केले. आधुनिक व्यवस्थापनात नागरी पत संस्थाना विकासाचे साधन म्हणून बघितले जाते सर्वसाधारण नागरी पत संस्थात जनतेकडून तसेच सभासदांकडून ठेवी स्विकारुन व कर्जे देणे ही पत सस्थांची कार्यप्रणाली समजली जाते. परंतु या कार्यासोबतच पत संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासाच्यादृष्टीने विविध योजना राबविल्या जातात. त्यामुळे रोजगार निर्मिती होत असते अल्प व दिर्घ मुदतीचे कर्ज लोकांना तसेच सभासदांना दिले जाते.

Date of Online: 30 Jan 2023