Issue Description


Authors : डी. जी. म्हशाखेत्री

Page Nos : 430-435

Description :
गुन्हेगारी ही समस्या व्यक्ती व समाज यांच्या दृश्टीने एक सामाजिक घटना आहे. गुन्हेगारी समस्याही मानवी समाजात प्राचिन काळापासून निर्माण झालेली आहे. त्यामुळे गुन्ह्याचा अभ्यास विविध सामाजिक षास्त्रांमध्ये केला जातो. गुन्हेगारीचा सर्वांगीन अभ्यास करणारे षास्त्र म्हणून ष्अपराधषास्त्रश् किंवा ष्गुन्हेषास्त्रश् ;ब्तपउपदवसवहलद्ध हे स्वतंत्र षास्त्र विकसित झालेले आहे. प्रत्येक समाजातील मुल्यव्यवस्था वेगवेगळी निर्माण झालेली आहे. या मुल्यव्यवस्थेनुसार समाजातील प्रत्येक घटकांनी वर्तन व्यवहार करावे अषी प्रत्येक समाजाची अपेक्षा असते. या समाजमान्य मुल्यव्यवस्थेविरूध्द एखादया व्यक्तीने वर्तन केल्यास ते समाजाच्या दृश्टीने गुन्हा ठरते व त्या व्यकीला गुन्हेगार ठरविले जाते. अषा गुन्हेगाराला समाजाद्वारे षिक्षासुध्दा ठरविलेली असते. गुन्हेगारी या समस्येचा भारतीय समाजापुरता विचार केल्यास असे लक्षात येते की, पुर्वी समाजात धर्माचा प्रभाव अधिक होता. त्या -त्या धर्मानुसार व्यक्तीने वर्तन करणे बंधनकारक होते. धर्माविरूध्द वर्तन करणे म्हणजे पाप समजले जायचे. त्याकाळी धर्म हे समाजनियंत्रणाचे प्रभावी माध्यम होते. परंतू आधुनिक काळात धर्माचा प्रभाव कमी झाला व विविध कायद्यांची निर्मीती झाली. या कयदेव्यवस्थेत कायदाविरोधी वर्तन गुन्हामानले जाते व गुन्हा करणारी व्यक्ती गुन्हेगार संबोधली जाते. देषातील दारिद्रय, बेरोजगारी या सारख्या समस्येप्रमाणे गुन्हेगारीही एक सामाजिक समस्या बनलेली आहे. गुन्हेगारी ही केवळ भारतातीलच नाही तर जागतीक समस्या बनलेली आहे. भारतातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी कायद्याची निर्मिती केलेली आहे. परंतू कायद्यांची अंमलबजावणी प्रमाणिकपणे होणे गरजेचे आहे. तसेच गुन्हेगाराकडे आधुनिक काळात मानवतेच्या दृश्टीकोणातून पाहिले जात आहे.

Date of Online: 30 Jan 2023