Authors : श्वेता शिरीष गुंडावार
Page Nos : 401-404
Description :
कौटुंबिक ध्येये गाठण्यासाठी व्यवस्थापन करणे नेहमीच आवश्यक असते. ध्येये पूर्ण झाली की, समाधानाची प्राप्ती होवून जीवनात आनंद निर्माण होतो. अशा या कौटुंबिक ध्येयाच्या पूर्ततेसाठी जी व्यवस्थापन प्रक्रिया उपयोगात आणल्या जाते ती गृहव्यवस्थापन प्रक्रिया होय. त्या प्रक्रियेत नियोजन, नियंत्रण व मुल्यांकन अशा तीन पायऱ्यांचा समावेश होतो व या तीनही पायऱ्यामध्ये काम करीत असताना विविध संसाधनांचा वापर केल्या जातो ही संसाधने मर्यादित असल्याने ती वाया जावू नये व तिचा वापर योग्य व्हावा म्हणून योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. अशी संसाधने दोन प्रकारची असतात; १) मानवीय २) अमानवीय. नौकरी करणाऱ्या स्त्रियांनी गृहव्यवस्थापन साधत असताना अमानवीय संसाधानांबरोबर मानवीय संसाधनांचा वापर केल्यास कमी खर्चामध्ये कामाची पूर्तता होते व पैसा हे अमानवीय संसाधन दुसऱ्या कार्यासाठी उपयोगात आणता येते.