Authors : संतोष सितारामजी आडे
Page Nos : 396-400
Description :
पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अबंध निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. यासाठी ग्रामसभा कोषाचे स्वतंत्र बँक खाते आवष्यक आहे. शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभाकोषाच्या खात्यावर निधी थेट बँकेमार्फत वितरीत करण्यात येतो. वर्षाच्या सुरुवातीलाच निधी जमा होणार असल्यामुळे वर्षभरात तो आपल्या गावाच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वापरता येईल. आपल्या ग्रामपंचायतीअंतर्गत असलेली गावे, पाडे व वाड्याा यांच्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी वापरावयाचा आहे. त्यामुळे सर्वांना समान लाभ मिळून विकासापासून कुणीही वंचित राहणार नाही.ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीतून घ्यावयाची कामे ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठरविणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या माध्यमातून लवकर निर्णय घेता येतील आणि त्याची अंमलबजावणी देखील तितक्याच तत्परतेने होऊ शकेल. ग्रामसभेच्या मान्यतेने आपल्या गावाची ‘ग्रामसभाकोष समिती’ निधीचा खर्च करेल. ग्रामसभेने केलेली कामाची निवड म्हणजेच निवड केलेल्या कामास प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे समजण्यात येईल. तीन लाखाच्या आतील विकास कामांना स्वतंत्रपणे तांत्रिक मान्यतेची देखील आवश्यकता राहणार नाही. तीन लाखापेक्षा जास्त खर्चाचे विकास काम असेल तर प्राधिकृत अधिकाÚयाची मान्यता घ्यावी लागेल.
गावाला मिळालेल्या निधीचा वापर करण्याचे स्वातंत्र्य ग्रामसभेला मिळाले आहे. पण त्याचबरोबर निधीचा योग्य प्रकारे वापर करण्याची मोठी जबाबदारी देखील ग्रामसभेवर आलेली. यासाठी ग्रामसभेने अबंध निधीचा वार्षिक नियोजन आराखडा तयार करुन दरवर्षी 1 मे रोजी होणाÚया ग्रामसभेमध्ये वार्षिक आराखड्यााला मान्यता घेणे बंधनकारक आहे. आराखडा तयार करताना गाव, पाडे, वाड्याा येथील ग्रामस्थांचा विचार घेणे आवश्यक आहे.