Authors : संगीता श्रीकांत बढे, प्रज्ञा जुनघरे
Page Nos : 384-389
Description :
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिला नररत्नाची खाण म्हणून पुजल्या जाते. असे म्हटल्या जाते की, एका स्त्री मध्ये संपूर्ण जग सामावालेले असते, संपूर्ण जगाला दृश्टी देण्याची व प्रगतीपथावर नेण्याचे अनमोल कार्य एक स्त्री करत असते. आपल्या देषात सोषल मिडियाच्या माध्यमातून, विविध व्याख्यानंाच्या माध्यमातून अनेक स्त्री विचारवादी आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. स्त्री ही पुरूशाच्या खाद्यांला खाद्या लावून आपली जबाबदारी पार पाडत असते, प्रत्येक क्षेत्रात ती यषस्वीरित्या कार्य करते, ती स्वतंत्र आहे वगैरे वगैरे. पण वास्तवात मात्र नारीवाद्यांचे हे सर्व विचार भावनाषुन्य होताना दिसतात जेव्हा ही स्वतंत्र समजल्या जाणारी स्त्री बलात्काराला, षोशणाला बळी पडते. नेहमी स्त्रीच बलात्काराला व षोशणाला बळी का पडते?
लहान पणापासूनच मुलींना पुरूशाच्या मदतीची गरज भासवल्या जाते. लहानपणी वडील, भाऊ, लग्नानंतर पतीच्या आधाराने जगणारी ही स्त्री पतीच्या निधनानंतर स्वतःला निराधार व असुरक्षित समजायला लागते व याच असुरक्षिततेच्या भीतीपोटी अन्यायाला अत्याचाराला बळी पडते. पतीनिधनानंतर जेव्हा समाज स्त्रीला ‘‘विधवा’’ हे विषेशण लावतो त्यावेळी ती स्त्री मनो-सामाजिकरित्या खचून जाते. कारण विधवा हा एक षब्द नसून तो एक घाव आहे. ज्याची खपली ही प्रत्येक धार्मिक कार्याच्या वेळी निघत असते. समाजात तिला मिळणारी ही दुय्यम दर्जाची वागणूकच तिला कमकूवत बनवते व ती स्वतःला असुरक्षित समजायला लागते. ही निराधार व असूरक्षित समजण्याची मानसिकता षिक्षित व अषिक्षित स्त्रियांमध्ये जवळपास सारख्याच प्रमाणात दिसून येते. भारतातील सतीप्रथा बंद झाली पण स्त्रियांवरील अत्याचार मात्र बंद झाले नाही. फक्त त्याचे स्वरूप मात्र बदललेले आहे. आजही समाजात विधवांची जी सद्यस्थिती आहे, जीवन जगताना त्यांना अपमानाच्या ज्या आगीत होरपळावे लागत आहे त्यापेक्षा सतीच्या कुंडातल्या आगीचे चटके कमी होते. जे फक्त एकदाच बसत होते. विधवा होवून रोजच्या मरणापेक्षा चितेवर सती जावून एकदाच मरण कितीतरी पटीने चांगल होत अषी विधवांची व्यथा आहे.
विधवा स्त्रीला समाजामध्ये वावरताना तिच्या राहणीमानापासून तर तिच्या छोटया छोटया हालचालीपर्यंत अनेक प्रकारची बंधन घालण्यात येते. एकीकडे जो समाज तिच्या सन्मानाबद्दल, सहनषीलतेबद्दल, कार्याबद्दल कौतुक करीत असतो तो समाज दुसरीकडे तिच्या अपमानाचे व षोशणाचे कारणही बनताना दिसते.
समाजात विधवेच्या या वाईट परिस्थितीमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे. आणि प्रत्येकानी ही सुरूवात स्वतःपासून सुरू करायला पाहिजे. कारण समाज हा संबंधाचे जाळे आहे. आणि याचा पाया व्यक्ती आहे. ज्या दिवषी प्रत्येक व्यक्ती ही स्त्रियांच्या सन्मानाबद्दल प्रत्यक्षरित्या व वैचारीक रूपात विचार करून त्याप्रमाणे आचरण करायला लागेल त्यादिवषी समाजातील प्रत्येक विधवा स्त्री ही स्वतःला सुरक्षित व आत्मनिर्भर समजायला लागेल.
प्रस्तुत संषोधन लेखातून समाजातील विधवा महिलांच्या समस्यांचा आढावा घेणे, कुटूंबात आणि समाजात त्यांच्याषी होणारा अनुभव, विधवा स्त्रियांना सासरी, माहेरी मिळणारी वागणूक त्यांच्या मुलांचे प्रष्न, त्यांची होणारी मानसिक, षारीरिक हेळसांड याकडे समाजाचे लक्ष वेधणे हे प्रमुख उद्देष आहे.