Authors : एस.एम.सातपुते
Page Nos : 378-383
Description :
जागतीकीकरणाच्या युगात ”हे विश्वचि माझे घर“ ही संकल्पना तंत्रविज्ञानाने प्रत्यक्ष अगदी जवळ आणण्याचे काम केलेले आहे. ज्ञानाच्या कक्षा तंत्रविज्ञानामूळे विस्तृत होत आहेत. नवयुगातील युवकांना आव्हान पेलण्याचे सामथ्र्य शैक्षणिक तंत्रविज्ञानाने निर्माण केलेले आहे. सर्वासाठी गरजेनुसार, सहजसाध्य, निरंतर प्रभावी शिक्षण देण्याच्या मार्गातील अडचणी दूर करून कार्यातील समस्या सोडविणे हे मूख्य उद्दिष्ट आहे. शैक्षणिक तंत्रविज्ञानाने विद्यार्थी केंन्द्रीत मानवतावादी तत्वज्ञानाचा सुयोग्य मेळ घातला आहे. ज्या ज्ञानाचे उपयोजन शैक्षणिक तंत्रविज्ञान करते त्या ज्ञानात शिक्षणशास्त्रापेक्षा इतर शास्त्रांनी अधिक भर टाकली आहे. अनुदेश तंत्रविज्ञान, अध्यापन तंत्रविज्ञान, वर्तनवादी तंत्रविज्ञान, माध्यम तंत्रविज्ञान आणि प्रशिक्षण तंत्रविज्ञान असे विविध शैक्षणिक तंत्रज्ञानाची रूपे सांगता येईल.