Authors : रंजना भा. व्यवहारे
Page Nos : 371-377
Description :
समाजात राहणा-या प्रत्येक व्यक्तिचे व्यक्तिमत्व हे एक दुस-या पेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे असल्याचे दिसून येते. प्रत्येक व्यक्ति आपल्या परीने राहण्याचा प्रयत्न करतो. काही व्यक्ति जसे आहेत तसेच राहतात. पण काही व्यक्ति समाजात वावरतांना आपल्या व्यक्तिमत्वाची छाप,ठसा उमटविण्याचा प्रयत्न करतात. याकरीता त्याने आपले व्यक्तिमत्व विकसीत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. व्यक्तिचे व्यक्तिमतव विकसीत होण्यामध्ये अनेक घटकांचा समावेष असतो. जसे त्याचे घरातील वातावरण, आजूबाजूचा परिसर, त्याचे मित्रमंडळ, षिक्षक, या सर्व गोष्टीचा व्यक्तिच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव राहतो. तसाच प्रभाव आणखी एका गोष्टीचा त्याच्यावर प्रभाव राहतो तो म्हणजे ग्रंथालय. व्यक्ति शालेय जीवना पासूनच ग्रथालयाच्या संपर्कात येतो. ग्रंथालयात जे वेगवेगळया प्रकारचे वाचन साहित्य असते जसे की, कथा, कादंबरी, थोरा मोठयाचे चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिमत्व विकासावरील पुस्तके, स्पर्धा परीक्षे वरील पुस्तके, जनरल नाॅलेज, अनेक प्रकारची मासिके, अनेक वुत्तपत्रे अषाप्रकारच्या साहित्याचे वाचन केल्यानंतर व्यक्तिच्या ज्ञानात वाढ होत जाते तसेच व्यक्तिमत्वाचा विकास होतांना दिसून येतो. व्यक्तिच्या ज्ञानाची लालसा भागविण्याचे काम ग्रंथालय करीत असते. म्हणूच व्यक्तिच्या व्यक्तिमत्व विकासात ग्रंथालयाचे स्थान मोलाचे असल्याचे दिसून येते.