Issue Description


Authors : आर. पी. करोडकर

Page Nos : 363-368

Description :
सदर संषोधनामध्ये अध्ययन विषय हा ग्रामीण स्वराज्य संस्थेषी निगडीत असल्यामुळे स्थानिक स्वषासन संस्थेवर विषेष भर देण्यात आला. भारतीय, सामाजिक व राष्ट्रीय जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणुन स्थानिक स्वषासन संस्थेचा पुरातन काळापासून स्विकार करण्यात आला आहे. लोकषाहीची मूल्ये नागरीकांपर्यंत पोहचण्यामध्ये स्थानिक स्वषासनाच्या महत्वाचा वाटा आहे. जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी स्थानिक स्वषासन संस्था विषेष करुन ग्राम पंचायत संस्थांचा ग्रामीण विकासामध्ये महत्वाचा वाटा आहे. लोकषाही प्रधान देषामध्ये अनेक महत्वाची कार्य या संस्थांकडून केली जातात. सदर प्रकरणामध्ये विविध विचारवंताच्या स्थानिक स्वषासना बददलच्या व्याख्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे अध्ययनाला मजबूती आलेली आहे. या संस्थांमुळे ग्रामीण जीवनावर फार मोठे परिणाम होतात. यावर प्रकाष टाकलेला आला आहे. 73 व्या घटना दुरुस्तीमुळे या संस्था लोकाभिमूख कषा झाल्या याची माहिती देण्यात आली असून ग्राम पंचायत व सरपंचाची ग्रामीण विकासातील भूमिका विषद करण्यात आलेली आहे. प्रस्तुत प्रबंधात गडचिरोली जिल्हयातील सर्व तालुक्यातील ग्राम पंचायतीमधील महिला व पुरुष सरपंचांच्या 2005 ते 2010 या कार्यकाळातील नेतृत्वाचे व कार्याचे अध्ययन अंतर्भूत आहे. गडचिरोली जिल्हयात एकुण 12 तालुके असून ग्राम पंचायतीची एकुण संख्या 467 आहे. उपरोक्त 467 ग्राम पंचायतीपैकी 428 ग्राम पंचायतीमध्ये सरपंच पद कार्यरत असुन त्यापैकी 140 ठिकाणी महिला सरपंच व 288 ठिकाणी पुरुष सरपंच आहेत. असे एकुण 428 सरपंचाचे नेतृत्व ग्राम पंचायतीवर लाभले आहे. गडचिरोली जिल्हयातील चामोर्षी, अहेरी, भामरागड, आरमोरी, सिरोंचा, मुलचेरा, गडचिरोली, देसाईगंज, कोरची, धानोरा, कुरखेडा, एटापल्ली इत्यादी तालुक्यातील स्थानिक स्वषासनात कार्य करणाÚया सरपंचाच्या नेतृत्वाचे व कार्याचे चिकित्सक अध्ययन करुन निष्कर्षा प्रत पोहोचणे हा उदेष अध्ययन व संषोधनाचा आहे.

Date of Online: 30 Jan 2023