Authors : प्रफुल्ल तु. बन्सोड
Page Nos : 345-354
Description :
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटनेने धर्म, वर्ण, जात, लिंगविहिन समानतेचा पुरस्कार केला हे खरे असले तरी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या साठ वर्शाच्या कालखंडातही राज्यघटनेत नमुद असणारी समानता भारतात अस्तिवात येऊ षकली नाही. हे खेदजनक आहे. स्त्रिया षिकल्या, कमावत्या झाल्या तरीही स्त्रियांचे आर्थिक प्रष्न सुटलेले दिसत नाहीत. स्त्रियांकडे बघण्याचा पुरूशी दृश्टीकोण अजुनही बदलला गेलेला नाही. जागतिकीकरण आणि खाजगीकरणाच्या आजच्या युगात स्त्री जीवनासंदर्भातील अनेक समस्या, गुतांगुत वाढतच गेलेली दिसते. स्त्रीचळवळ ही. हुंडाबळी, हत्या, बलात्कार, स्त्रीभूणहत्या, स्त्रीयांवरील मानसिक षारीरिक अत्याचार अषा मुलभूत प्रष्नांभोवती फिरत राहिली. ही सगळी पाष्र्वभुमी 1960 नंतर स्त्रियांनी आपल्या साहित्यातून अभिव्यक्त केली आहे. साठोत्तरी साहित्यात कथा, कविता आणि कादंबरी या वाड;मय प्रकारांमध्ये स्त्रिलेखीकांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले. या कालखंडातील साहित्याचे कालखंडानुसार दोन टप्पे मानता येतील, 1960 ते 1975 व 1975 ते आजतागायत. 1960 ते 1975 या कालखंडातील बरेच स्त्रीलिखित साहित्य पारंपारिक प्रेक्ष्यातून निर्माण झालेले दिसते. कथा आणि कांदबरीच्या क्षेत्रात मोठया प्रमाणात पुरूशी साहित्याचे अनुकरण झालेले दिसते. काही तुरळक लेखिकांनीच स्त्रियांच्या प्रष्नांविशयी आणि एकदंरीत सामाजिक प्रष्नांविशयी गांभीर्याने लेखन केले आहे. 1975 नंतर मात्र युनोने जाहीर केलेल्या स्त्री दषकाच्या निमित्ताने स्त्रियांच्या प्रष्नांविशयी सजग भान निर्माण झाले. याला आपला देषही अपवाद नव्हता. 1975 नंतर भारतात स्त्रिया संघर्श करून आपले अधिकार मिळवण्यासाठी सिध्द झाल्या. महाराश्ट्रात स्त्रीवादी चळवळीने स्त्रियांच्या प्रष्नांविशयी जागृती निर्माण केली. याचा परिणाम असा झाला की, स्त्रिया आपल्या अस्मितेचा षोध साहित्यातून घेऊ लागल्या. मराठी स्त्री लिखित कवितेत याचे प्रतिबिंब प्रकर्शाने उमटले आहे. कथा आणि कादंबरीतून काही मोजक्या लेखिकांनी स्त्री स्वातंत्र्याची मांडणी केली. स्त्रियांच्या माणूसपणाविशयीचे विचार अभिव्यक्त केेले. कौंटुबिक, सामाजिक स्वातंत्र्यापासून लैंगीग स्वातंत्र्याचा पुरस्कारही करण्यात आला. मराठी स्त्री लिखित साहित्यात 1975 नंतर झालेले स्थित्यंतर स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा षोध घेणारे आहेत.