Authors : मृणाली एन. वसाके, पी. एस. माहोरे
Page Nos : 331-337
Description :
प्राचीन काळापासून पूर्व विदर्भामधील चंद्रपूर हे नगर महत्वपूर्ण षहर म्हणून ओळखले जाते. अगदी प्राचीन काळापासून तर मध्ययुगीन आधुनिक काळापर्यंत वेगवेगळ्या सत्ताधिषांनी आपली सत्ता याठिकाणी स्थापन केली.त्यामध्ये मध्ययुगाचा विचार केला तर गोंड, भोसले हे सत्ताधिष होते तर आधुनिक काळामध्ृये ब्रिटिष हे परकिय सत्ताधारक होते. संपूर्ण भारतावर यांच राज्य होतं तसेच त्यांनी या चंद्रपूर षहरावर सुद्धा राज्य केल. इ.स. 1818 ला मराठे षाही लयाला गेली आणि संपूर्ण महाराश्ट्रवर ब्रिटिषांची सत्ता आली. चंद्रपूर मध्ये ब्रिटिषांनी इ.स.1854 ला आपली सत्ता स्थापन केली आणि इ.स. 1867 ला स्थानिक प्रषासन चालविण्याकरिता त्यांनी मुनसिपल कमिटीची स्थापना केली. परंतु इ.स. 1867 ला राज्य करतांना प्रषासन व्यवस्था चालविण्यासाठी सुरवातीला त्यांनी स्थानिक लोकांचा सहभाग न घेता, स्वतःच इंग्रज प्रेसिडेव्ही द्वारे प्रषासन चालवू लागले. इंग्रजानी इ.स. 1867 पासून 1886 पर्यंत चंद्रपूर नगरपालिकेचा कारभार 25 डेप्युटी कमिषनरांच्या द्वारा केले त्यानंतर मात्र 1886 पासून षहरातील स्थानिक प्रतिश्ठित लोकांचा, सहभाग घेण्यात आला, इंग्रज हे विकासवादि वृत्तीचे होते. म्हणून राज्यकारभार करतांना त्यांना षहराचा विकास करायचा होता त्याकरीता त्यांनी स्थानिक लोकांचा सहभाग करून घेतला आणि विकास कामाला सूरवात केली, सुरवातीला निवडणूक न घेता षहरातील प्रतिश्ठित व्यक्तीचा सहभाग घेण्यात आला. स्थानिक लोकांचा सहभागामुळे विकास कामाला गती आली. कारण आता इंग्रज प्रेसिडेव्ही बरोबरच स्थानिक प्रतिनिधी सुद्धा षहर विकास कामात सहभागी होऊ लागले. जनतेच्या समस्या, प्रष्न, गरजा समजून घेणे आणि त्यांना विविध माध्यमातून वेगवेगळ्या सोयी-सुविधा पुरवून जनतेचे हित जोपासणे, कल्याण करणे आणि षहराचा विकास करणे हे प्रषासनाचे मुख्य कर्तव्य बनले होते आणि त्यानुसार कार्य करून त्यांनी आपली वाटचाल केली होती.