Authors : मनोहर आनंदराव गुडधे
Page Nos : 315-320
Description :
आधुनिक काळातील एक महŸवपूर्ण व गंभीर समस्या म्हणून विस्थापनाच्या समस्येकडे पाहिले जाते. मानवाने साध्य केलेल्या विकासाच्या कार्यातून व त्यातल्यात्यात नैसर्गिक आपŸाी या दोहोमधून मानव व मानवी समुदायावर विस्थापनाची स्थिती ओढावत असते. विस्थापन या प्रक्रीयेत मानवाला आपल्या वास्तव्याचे मुळ ठिकाण सोडून दुसÚया ठिकाणी जावे लागते किंवा जाण्यास भाग पडते. यामूळे व्यक्तीला आपले उत्पन्नाचे साधन, जमीन व घराचे हक्क तसेच त्यांचे सामाजिक संबध यांना मुकावे लागते. विस्थापनाच्या नैसर्गिक कारणात भुकंप, महापूर, त्सुनामी, दुश्काळ, अतिवृश्टी तसेच ज्वालामुखी या घटकांचा समावेष होतो. तर धरणांची निर्मिती, ऊर्जा प्रकल्प, सेझ, खनिज उत्खनन प्रकल्प व वाढत्या गरंजाची पुर्तता म्हणून मोठया प्रमाणावरील औद्योगीकरणाचा अवलंब इ. अषा बाबींचा मानव निर्मित कारणात समावेष होतो. अषातच यूद्ध व अलिकडच्या काळातील दहषतवाद, आतंकवाद, नक्षलवाद इ. कारणामूळे सुद्धा मानवी जीवनात अस्थिरता निर्माण होऊन मानवावर विस्थापनाची पाळी येतांना दिसते विकासाच्या नावावर अनेक धरणे, कारखाने, महामार्ग, औद्योगीक वसाहती इत्यादीची निर्मिती होत असलीतरी मात्र त्यामुळे अनेक गावे उठवीली जातात व लोकांवर विस्थापीत होण्याची वेळ येते. विस्थापनात व्यक्तीला आपल्या मुळच्या जागेवरून जाणीवपूर्वक तसेच बळाच्या साहयानेही हटविले जाते. त्यामूळे लोकांचे आजवर अस्तित्वात असलेले सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवन उध्वस्त होऊन व्यक्तींना मुळच्या पर्यावरणाऐवजी नवीन वातावरणाषी समायोजन साधने भाग पडते. विस्थापनाने आधुनिक काळात मानवी जिवनात अस्थिरता निर्माण करतांनाच अनेक गंभीर प्रष्न निर्माण केले आहेत. ज्याचे दुर्गामी परिणाम हे आरोग्य, षिक्षण, बेरोजगारी, मनोरंजनाचा अभाव, संस्कृतीचा Úहास इ. अषा दृष्य स्वरूपात दिसत आहेत.