Authors : डि. एन. मोहितकर
Page Nos : 305-308
Description :
मागील काही वर्षापासून उद्योजकतेचे वारे चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात वाहायला लागले. नोकरीच्या मागे वळणारा तरुण व्यवसायाचा विचार करायला लागला. उद्योगांच्या बाबतीत शहरी किंवा ग्रामीण यात भेद राहीलेला नाही. समस्या व गरजा दोघांच्याही समान आहेत. या गरजा व समस्या निर्मूलन करण्यासाठी सर्वप्रथम ‘‘स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना’’ अंमलात आली. या योजनेची अंमलबजावणी करतांना गरीब व्यक्तीच्या क्षमतेचा विकास, कौशल्य विकास, कर्ज, विपणन आणि पायाभूत सहायतेवर विशेष भर देऊन रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. याचे अध्ययण या शोधनिबंधात केले आहे.
त्यानंतर ही योजना ‘‘राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान’’ मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून दारिद्रय कमी करण्याचा प्रयत्न झाला.
याच योजनेला ‘‘दिनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना’’ मध्येे रूपांतर करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकास व इतर उपायांच्या माध्यमातून जीवन जगण्याच्या पध्दतीमध्ये वाढ करून शहरी व ग्रामीण गरिबी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पुढे या योजनेला ‘‘स्टार्ट अप ग्रामीण उद्योजकता कार्यक्रम’’ हि योजना केंद्र सरकारने सुरू केली एखादा देश प्रगत होण्यामागे त्याची उद्योगवृत्ती आणि उद्योजक विचारसरणी कारणीभूत असते.
हे लक्षात घेऊन सरकारने चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागातील युवकांना उद्योगाच्या संधी उपलब्ध करून दिल्या यामुळे बेरोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे.
‘स्टार्टअप ग्रामीण उद्योजकता योजना’ हा केंद्र सरकारचा एक उपक्रम आहे. ज्याचा उद्देष रोजगार आणि संपत्ती निर्माण करणे हा आहे. स्टार्टअप ग्रामीण उद्योजकता उदिश्ट भारतातील रोजगार वाढवताना उत्पादने आणि सेवा विकसीत करणे आणि नाविन्यपूर्ण करणे हे आहे. सरकार स्टार्टअप ग्रामीण उद्योजकता उपक्रमाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी केंद्र सरकारने स्टार्टअप हि योजना अंमलात आणली.
सदर योजनेच्या आधी ‘स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना’ ही अस्तित्वात होती. या योजनेचे ‘राश्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. सदर अभियान केंद्र षासन 75 टक्के व राज्यषासन 25 टक्के पुरस्कृत आहे. तळागळातील गरीबांसाठी मजबूत अषा संस्थांची बांधणी करून त्याद्वारे लाभदायक स्वयंरोजगार व कुषल वेतन रोजगाराची संधी मिळविणे तसेच गरीब कुटुंबाना षक्य व्हावे व त्याद्वारे त्यांचे दारिद्रय कमी करता यावे या करीता परिणामी कायमस्वरूपी तत्वावर त्यांच्या उपजिविकेत सुधारणा करण्याचा प्रयत्न होत आहे. पुढे हिच योजना ‘दिनदयाल अंत्योदय योजना’ या नावाने 25 सप्टेंबर 2014 रोजी लागू करण्यात आली. ग्रामीण व षहरी गरीबांच्या जीवन स्तरांमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा उद्देष आहे. या योजनेच्या साहाय्याने कौषल्य विकास आणि इतर उपायांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात रोजगार संधीमध्ये वाढ करून षहरी आणि ग्रामीण गरिबांच्या संख्येत घट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वरील योजनांचा आढावा घेऊन चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भागात स्टार्टअप ग्रामीण उद्योजकता कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील व्यवसाय, उद्योग याविशयी अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यातून ग्रामीण तरूणांमध्ये उद्योगजकतेचे वातावरण तयार झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण परिसराला मिळू षकतो. ग्रामीण भागातील दारिद्रय रेशेखाली असणाÚया कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर हा विभाग केंद्र सरकारच्या या उपयुक्त रोजगार निर्मिती योजनेच्या अंमलबजावणी करीता कार्यरत आहे.