Authors : भारती दि. रत्नपारखी-चिमुरकर
Page Nos : 284-290
Description :
आधुनिक भारताचा विचार करता आजमितीला भारताला स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे झालीत. आधुनिकीकरणाच्या काळात भारताने जागतिकीकरणाचा मार्ग स्वीकारला. या मार्गात प्रामुख्याने औद्योगिकीकरणांनी नटलेला शहरी भाग आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलभूत कणा म्हणून गौरविण्यात येणारा ग्रामीण भाग अशा दोन बाजूचाच भारतीय विकासाच्या दृष्टिने विचार केला जातो. पण या दोन बाजू व्यतिरिक्त अनेक विकास योजनापासून दुर्लक्षित राहणारा, दÚयाखोÚयांचा आश्रय घेऊन निसर्गाच्या सहवासात आपली संस्कृतीमूल्ये जपत विकासासाठी धडपड करणारा समाजसमूह असलेल्या आदिवासी समाजाकडे फारसे कोणाचे लक्ष नाही.
भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेला अनुसरून सर्वसामान्यांना शिक्षणाचा मुलभूत हक्क मिळावा व या शिक्षणाचे बाळकडू घेत सर्वांनी आपला विकास साधत मानवी मूल्यांची जोपासना करावी या उद्देषाने शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यात आले. याचा परिणाम म्हणून साठोत्तरी कालखंडापर्यंत औद्योगिकीकरणाच्या आधारभूत शिला ठरणाÚया शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत सार्वत्रिक शिक्षणाचे ओझरत्या स्वरूपात दर्शन व्हायला सुरुवात झाली, परंतु तेही विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित होते. प्राचीन कालखंडापासून आजतागायत गावकीच्या भावबंधनापासून दूर सारत सदोदित गावाच्या वेशीवर टांगल्या गेलेल्या बहुजन समाजाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. आंबेडकर यांच्या ”शिका, संघटित व्हा! आणि संघर्ष करा“ या क्रांतीरूपी विचारांची ज्योत तेवत ठेवत आपल्या विकासाचा मार्ग कटीबद्ध करीत जीवनानुभवाला सुरुवात केली. याच शिक्षणविशयक विचारधारेचा आधार घेत ग्रामीण भागातील तळागळातील समाज शिक्षणाची कास धरू लागले. परंतु या सार्र्वित्रक शिक्षणाच्या प्रवाहात ग्रामीण व शहरी भागापासून कोसो दूर असणाÚया जंगलपहाड, दÚयाखोÚयाच्या आश्रयाला असणारा आदिवासी समुदाय मात्र साठोत्तरी दशकापर्यंत सामील होऊ शकला नाही. कदाचित या काळातील शिक्षण हे ग्रामीण भागापर्यंत पोहचले. परंतु जंगलदÚयांत व रानावनांत राहणाÚया आदिवासी समुदायाला शिक्षणाची आस लागलेली नसावी.