Authors : बादलशाहा डोमाजी चव्हाण
Page Nos : 277-283
Description :
साहित्य ही एक ललित कलाकृती आहे. ती सामाजिकतेच्या अधिक जवळची आहे. त्यामुळे व्यक्तिच्या तत्त्वज्ञानाचा आणि विचारांचा प्रभाव समाजावर पडतांना दिसतो. 19 वे षतक हे आधुनिक मराठी वाड्.मयाच्या प्रारंभीचे षतक होय. याच षतकात प्रामुख्याने माक्र्सवाद, आबेडकरवाद आणि गांधीवाचा प्रभाव मराठी साहित्यावर दिसू लागला. 1920 नंतर गांधीवादी मराठी वाड्मयाचा प्रवाह उदयास आला. समकालीन वास्तवाने मानवी समाज-संस्कृती समोर निर्माण झालेले प्रष्न-समस्या सोडविण्यासाठी महात्मा गांधीचे विचार एक चांगला पर्याय आहे. महात्मा गांधीच्या षिकवणूकीतून लढण्याचे नैतिक बळ मिळते. त्यांनी उपोशण, सत्याग्रह, सविनय कायदेभंग ईत्यादींचा वापर करुन देषातील जनतेचा उध्दार केला. त्याचे पडसाद मराठी साहित्यातही पडणे स्वाभाविकच होते. स्वांतत्र्यलढयाच्या काळात महात्मा गांधीनी वेगवेगळया विशयांवर आपले विचार मांडले त्यांच्यानंतर त्यांचा हा वारसा त्यांचे अनुयायी विनोबा भावे आणि जयप्रकाष नारायण यांनी चालविला. या त्यांच्या विचारांना ढोबळमानाने ‘गांधीवाद’ असे म्हंटले जाते. अहिंसा, अपरिग्रह, श्रमप्रतिश्ठा, स्वावलंबन या तत्वावर विष्वास ठेवणारी राजकीय विचारप्रणाली म्हणजे ‘गांधीवाद’ होय. महात्मा गांधीनी स्वतः आपल्या ‘हरिजन’ व ‘यंगइंडिया’ या साप्ताहिकातून प्रबोधनपर विपूल लेखन केले. त्यांनी ‘माझे सत्याने प्रयोग’ ही आत्मकथा लिहिली. या सर्व लिखानातून त्यांची वैचारिक भूमिका स्पश्ट होते.
महात्मा गांधीचे विचार व आचार म्हणजे ‘गांधीवाद’ होय. एका पदयात्रीला संदेष देतांना गांधी म्हणतात की, ‘माझे जीवन हाच माझा संदेष’ हा गांधीवादाच्या बाबतीतही तितकाच सत्य आहे. गांधीजीच्या विचारांना आचाराचा आधार होता. त्यामुळे त्यांची थोंरवी गाणारे व स्वातंत्र्य आंदालनाचे महत्व सांगणारे अनेक लेखक, कवी उदयास आले. कवी भा. रा. तांबे. माधव ज्युलियन, विठ्ठलराव घाटे, कवी यषवंत, प्रा. भ. श्री. पंडित, कवी कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, या कवींवर तर दादा धर्माधिकारी आयार्य जावडेकर, प्रभाकर दिवाण, आचार्य विनोबा भावे, वि. स. खांडेकर, वा. म. जोषी; साने गुरुजी, प्रेसा कंटक अषा अनेक लेखकांच्या साहित्यावर गांधीवादाचा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात पडलेला दिसून येतो.