Authors : अरूण राऊत व रविंद्र मुरमाडे
Page Nos : 272-276
Description :
अशोक पवार बालपणी घरच्या दारिद्रयामुळे भिक मागून जीवन जगले. अतिशय बिकट परिस्थितीत आपले शिक्षण एम.ए. पर्यंत पूर्ण केले. वडिलासोबत गावोगावी उदरनिर्वाहाकरीता भटकंती करावी लागत असल्यामुळे त्यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. भारतीय समाजव्यवस्थेने बहिश्कृत केलेल्या भटक्या विमुक्तांचे वास्तववादी चित्रण त्यांच्या लेखनात पाहायला मिळते. त्यांचे साहित्य दलित वळणावरचे आहे. त्यांनी मुख्यतः भटक्या जामतीच्या जीवनावर प्रकाष टाकला. त्यांच्या लेखनात वेदना ओतप्रेत भरलेल्या आहेत. त्यांच्या साहित्य कृतीची दखल घेत त्यांना अनेक राश्ट्रीय पुरस्कार पण प्राप्त झालेले आहेत. अषोक पवारांचे कांदबरी विष्व समाजाला एक वेगळी दिषा देणारे आहे. माणसाने माणसाषी अगदी माणसासारखं वागावं एवढीच त्यांची प्रबळ इच्छा आहे. अषोक पवार आपल्या कांदबरीतून आपल्या जमातीतील चालीरिती, रूढी, परंपरा, श्रध्दा, अंधश्रध्दा, त्यांचे प्रभावी चित्रण करतांना दिसतात. बदलते संदर्भ लक्षात घेता, वर्तमानात आजही कुठेतरी मानवाचे जीवन अनेक अंषाने व्यतित झालेले दिसते. स्वातंत्र्याला पाऊनषे वर्शे उलटली तरी आजही भटक्या जमाती सामाजिक, राजकीय, षैक्षणिक व सांस्कृतीक दृश्टया मागासलेले आहेत. भारतीय संविधानाने सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिलेला आहे. पण भटक्या विमुक्त जमाती आजही त्या अधिकारापासुन कोसोदूर आहेत. माणूस म्हणून जगण्याचे कुठलेच हक्क त्या भटकंती जमातीच्या वाटयाला आजही आलेले नाहीत. आयुश्यभर संघर्श करीतच त्यांना जीवन जगावे लागते. त्यांच्या पोटाचे प्रष्न आजही अनुत्तरीत आहेत. सतत पोलीसांचा मार आणि स्त्रियांचे अब्रुचे धिंडवडे सारेच कसे अमानवीय आणि विदारक आहे.