Authors : अंबादास भगवान तिरनकर व आषिश कृश्णाजी महातळे
Page Nos : 263-271
Description :
आदिवासी समाज हा मागासलेला समाज असुन तो जंगलात राहणारा, वनात भटकणारा, डोंगर दÚयात जिवन जगणारा मानवी समाज म्हणुन आपल्या समोर उभा राहतो. आदिवासी म्हणजे आदिपासुन राहणारे या भारत भुमीवर सर्वांत प्रथम मानव नर्मदा नदीच्या किनाÚयावर वास्तव्याला होता असे इतिहासकार व सिंधु संस्कृतीचे गाढे अभ्यासक श्री.पु.ग.सदार म्हणतात भारतात अनुसुचित जमातीची संख्या 700 पेक्षा अधिक आहे. महाराश्ट्र राज्यामध्ये एकुण 45 आदिवासी जमाती वास्तव्यास असुन केंद्रषासनाने अधिसुचित केलेल्या कोलाम, कातकरी व माडीया या आदिम जमातींचा समावेष सुध्दाया 45 जमातीमध्ये आहेत. आदिम जमाती हया इतर आदिवासी जमातीच्या तुलनेमध्ये अतिषय मागासलेल्या जमाती आहे. त्यामुळे केंद्रषासनाच्या वतीने आदिम जमातीच्या विकासाकरिता आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रम ही योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी समाजाचा षैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. महाराश्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाषिकव त्याअंतर्गत एकुण चार अपर आयुक्त (नाषिक, ठाणे, अमरावती व नागपुर) कार्यरत आहे. तसेच एकुण 30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय कार्यरत असुन यापैकी 11 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांना अतिसंवेदनषील प्रकल्पाचा दर्जा प्राप्त आहे.
चंद्रपुर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असुन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय चंद्रपुर च्या कार्यक्षे़़़़त्राअंतर्गत चंद्रपुर, बल्लारपुर, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, सावली, पोंभुर्णा, मुल व सिदेवाही या दहा तालुक्यांचा समावेष होतो. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय चिमुर च्या कार्यक्षेत्राअंतर्गत चिमुर, भद्रावती, वरोरा, नागभिड, ब्रम्हपुरी या पाच तालुक्यांचा समावेष होत असुन चंद्रपुर जिल्हयातील आदिवासी जनतेकरीता षिक्षण, आरोग्य, कौषल्य विकास, उपजिविका, कृशी, सिंचन, या पायाभुत सुविधांचा विकासाकरिता अनेक योजना चंद्रपुर जिल्हयातील आदिवासी जनतेकरीता उपरोक्त दोन्ही कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येतात.
त्यामध्येच कोलाम जमाती करीता आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रम हि योजना राबविण्यात येत असुन त्याअंतर्गत कोलाम जमातीचा विकास करणे हा या योजनेचा मुळ उद्देष आहे. सदर योजनेबाबत झालेली अंमलबजावणी त्यापासुन झालेला कोलाम जमातीला लाभ तसेच या योजनेपासुन कोलाम जमातीच्या जिवनमानावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा अभ्यास या षोध निंबधामध्ये करण्यात आलेला आहे.