Authors : विशाल डब्लू. मालेकार
Page Nos : 257-262
Description :
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण 2015-16 (एनएसएस) च्या 73 व्या फेरीनुसार देषातील एकूण उद्योगापैकी 90 टक्के उद्योग(6.3 कोटी उद्योग) सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे असून या उद्योगांच्या उत्पादनात 6500 प्रकारच्या विविध उत्पादनाचा समावेश आहे. देशाच्या एकूण रोजगारात 45 टक्के रोजगार म्हणजे जवळपास 12 कोटी रोजगार आणि देशाच्या एकूण निर्यातीत 48 टक्के वाटा सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा आहे.2016-17 मध्ये देशाच्या नाममात्र सकल देशांतर्गत उत्पादनातील(जीडीपी) वाटा 30 टक्के तर, सकल मुल्य उत्पादनातील(जीव्हीओ) वाटा 45 टक्के आहे. भविष्यात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचा सकल देषांतर्गत उत्पादनातील वाटा 50 टक्के पर्यंत घेउन जाण्याचे व देशाला आत्मनिर्भर बनविण्याची क्षमता व शक्ती एमएसएमई मध्ये असल्याचे वरील आकडेवारीवरून सहज निर्देषीत होते.
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेवर आधारीत सबका साथ, सबका विकास आणि आता त्यात सबका प्रयास जोडल्या गेलेला आहे. त्यामुळे स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडियाला साकार करण्याच्या दृश्टिने सरकारने सर्वसमावेशी विकासावर आधारीतएमएसएमईला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आखलेल्या आत्मनिर्भर भारताच्या महत्वकांक्षी धोरणामुळे देषाच्या अर्थव्यवस्थेचे निर्धारीत 5 ट्रिलीयन डॉलरचे उद्दिष्ट सहज गाठता येण्याच्या आशा यामुळे नक्कीच पल्लवित झालेल्या आहे. असेच म्हणावे लागेल.